30.2 C
Latur
Wednesday, March 3, 2021
Home लातूर कोरोना रुग्णांवर उत्कृष्ट उपचारासाठी विवेकानंद रुग्णालयाचा गौरव

कोरोना रुग्णांवर उत्कृष्ट उपचारासाठी विवेकानंद रुग्णालयाचा गौरव

एकमत ऑनलाईन

लातूर : कोरोना संकटकाळात बाधित रुग्णांवर योग्य पद्धतीने व सामाजिक भान राखत उपचार केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाच्या वतीने गौरवपत्र देऊन विवेकानंद रुग्णालयाचा सन्मान करण्यात आला. विवेकानंद रुग्णालयाने आजपर्यंत ७५० पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले.अजूनही रुग्णालयात १० रुग्णांवर उपचार सरु आहेत. अनेक रुग्णालयांनी उपचार बंद केलेले असतानाही विवेकानंद रुग्णालयाने शेवटचा रुग्ण दुरुस्त होईपर्यंत उपचार सुरुच ठेवण्याचा निर्धार केला आहे. रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना त्यांना आधार देण्याचे कार्यही रुग्णालयाकडून करण्यात आले.याशिवाय महात्मा ज्योतिबा फुले तसेच विविध शासकीय योजनांचा लाभही रुग्णांना मिळवून देण्यात आला.

१०० पेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्णांनी अशा योजनांचा लाभ घेतला.दारिर्द्य रेषेखाली असणा-या नागरिकांवरही शासकीय योजनेतून उपचार करण्यात आले.या सर्व कार्याची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाच्या वतीने गौरवपत्र देऊन रुग्णालयाचा सन्मान करण्यात आला. जिल्हा प्रशासनातील मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा नोडल अधिकारी रत्नराज जवळगेकर व लेखाधिकारी सतीश सूर्यवंशी यांनी विवेकानंद रुग्णालय व संशोधन केंद्राच्या अध्यक्षा अरुणा देवधर, प्रशासनिक संचालक अनिल अंधोरीकर यांना हे गौरव पत्र प्रधान केले. यावेळी डॉ. राधेशाम कुलकर्णी, गिरिष पत्रिके, डॉ. संतोष देशपांडे, डॉ. अभय सावरगावकर,मंगेश नायगावकर,कर्मचारी व्यवस्थापक अजय कुलकर्णी, महेश अंबुलगे, रमेश माडजे, तानाजी मानकोसकर, श्रीनिवास नक्का यांची प्रमुख उपस्थिती होती.

गावची ग्रामपंचायत पंढरी आहे तिचे पावित्र्य राखा -आदर्श गावचे सरपंच पेरे पाटील

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या