औसा: तालुक्यातील ५८ ग्रामपंचायची मतमोजणी मंगळवारी दि.२० रोजी सकाळी १० वाजता येथील प्रशासकीय इमारतीत झाली. यात बहूतांश ग्रामपंचायती विद्यमान सरपंच व गावपुढा-यांच्या ताब्यात राहिल्या आहेत. काँग्रेस, भाजप व शिवसेना ठाकरे गटाने आपापल्या ग्रामपंचायती राखल्या आहेत. आशीव ग्रामपंचायतीत माजी आमदार दिनकर माने समर्थकांचा पराभव झाला आहे. मंगळवारी २० डिसेंबर रोजी २२ टेबलवर ही मतमोजणी प्रक्रिया पार पडली .
औसा तालुक्यातील आंदोरा, आनंदवाडी, अशीव, उटी (बु), एकंबी-एकंबी वाडी-एकंबी तांडा, एरंडी, कन्हेरी, करजगाव, कवठा केज, कवठा लातूर, कवळी, काळमाथा, किनिथोट, किनिनवरे, खुंटेगाव, गुबाळ, गुळखेडा, गोंद्री, चिंचोली जोगण, चिंचोली सोन, जवळगा पो, जायफळ, जावळी-मुगळेवाडी, तांबरवाडी-राजेवाडी, तावशी (ताड), दापेगाव, दावतपुर, देवताळा, फत्तेपुर, बाणेगाव, बिरवली, बुधोडा, बोरगाव (न), बोरफळ-खानापुर तांडा, भंगेवाडी-महादेववाडी, मातोळा, माळकोंडजी, याकतपूर, येल्लोरी, येळवट, येळी-देवंग्रा, रामेगाव, लिंबाळा (दाऊ), लोहटा, वडजी, वरवडा, वांगजी, वानवडा, शिवणी लख, शिवली, सारणी, सारोळा, सिरसल, हिप्परगा (क), हिप्परसोगा, होळी, या ग्रामपंचायती करीता रविवारी दि.१८) मतदान पार पडले होते.
येथील तहसील कार्यालया शेजारील प्रशासकीय इमारतीत तहसीलदार भरत सूर्यवंशी यांच्या निरीक्षणाखाली मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली. तालुक्यातील ३३ ग्रामपंचायती आपल्या समर्थकांच्या ताब्यात असल्याचा भाजपाने दावा केला आहे तर शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी व तालुकाप्रमुख संतीश शिंदे यांनीही काही ग्रामपंचायतीवर दावा केला आहे. मनसेने चार सरपंच व १७ सदस्य निवडून आल्याचा दावा केला आहे. मातोळा वचिंचोली सोन ग्रामपंचायत माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शाम भोसले व उदयसिंह देशमुख यांचे ताब्यात राहिली आहे.