36.2 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeलातूरअपंग, कोरोनाबाधितांचे मतदान वाया जाऊ नये

अपंग, कोरोनाबाधितांचे मतदान वाया जाऊ नये

एकमत ऑनलाईन

लातूर : ०५-औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ -२०२० निवडणुकीसाठी जिल्ह्यात पदविधर मतदार संघात एकूण -८८ मतदान केंद्र असून यासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी वर्गांने अपंग, कोविड-१९ बाधित व टपाली मतदान वाया जावू नये म्हणून प्रयत्न करावे. तसेच जनजागृती करण्यासाठी फेसबुक सारख्या समाज माध्यमाचा योग्य वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे.

येथील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित ०५-औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ -२०२० नोडल अधिकारी, कर्मचारी पूर्व तयारी बैठकीत बोलत होते. या बैठकीस अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) सुचिता श्ािंदे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) शोभा जाधव, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) जीवन देसाई उपस्थित होते. ०५-औरंगाबाद पदविधर मतदासंघ पूर्व तयारी बैठकीस मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत म्हणाले की, प्रत्येक निवडूक वेगळी असते पण पदविधर मतदार संघाची निवडूक आगळी-वेगळी आहे. या निवडूकीसाठी नियुक्त केलेल्या प्रत्येक विभागासाठी अधिकारी, नोडल अधिकारी, कर्मचारी यांनी आपआपली निवडणूक कामे जबाबदारीने पार पाडावी.

पदविधर मतदार संघाची निवडणूक ही सहा वर्षांने येत असल्याने या निवडूकी बाबत जनजागृती करणे नितांत गरजेचे आहे. या निवडणूकीत मतदानाचे प्रमाण हे वाढले पाहिजे मतदान वाया जावू नये म्हणून मतदानाची जनजागृती प्रभावी पणे करावी असे त्यांनी सूचित केले.जिल्ह्यात पदविधर मतदार संघामध्ये मतदानाचे प्रमाण वाढ करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत. या निवडणूकीसाठी पोलीस विभागाने कायदा व सुव्यवस्था बाबतचे योग्य ते नियोजन करावे तसेच निवडणूकीमध्ये वापरण्यात येणा-या वाहनावर जीपीएस प्रणाली बसवून घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी यावेळी दिल्या. प्रारंभी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) सुचिता शिंदे यांनी -०५ औरंगाबाद पदविधर मतदारसंघ -२०२० बाबत पूर्वतयारी बैठकीची माहिती पीपीटीद्वारे विषद केली. या निवडूक पूर्व तयारी बैठकीस संबंधित विभागाचे अधिकारी, नोडल अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रेणा मध्यम प्रकल्प अजूनही तहानलेला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या