जळकोट : लॉकडाऊनच्या कालावधीतील वीजबिला मध्ये सवलत दिली जाईल, असे शासनाच्यावतीने आश्वासन देण्यात आले होते. परंतु अजूनही पूर्वी सारखेच वीज बिल येत असून ही सवलत कधी मिळणार असा प्रश्न ग्राहकांतून केला लात आहे. सध्या यााबाबत अजूनही संभ्रमच असून जैसे थे अशीच स्थिती आहे.
मार्च महिन्यापासून भारतासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोना महामारीने शिरकाव केला होता, या तोरणा रोगाच्या भीतीमुळे महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केले होते. त्यामुळे अनेक उद्योगधंदे बंद होते, खाजगी नोकरदार घरी आले होते, सर्व दुकाने बंद होती, मजुरांना काम मिळत नव्हते त्यामुळे मध्यमवर्गीयावर आर्थिक संकट ओढवले होते. अशात महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीने अनेक ग्राहकांना भरमसाट असे बिल दिले, हे बिल भरणे त्यांना शक्य नव्हते कारण अनेकांना कामच नव्हते यामुळे पोट भरायचं प्रश्न होता येथे वीज बिल कसे भरणार ? अनेक राजकीय पक्षांनी मागण्या केल्यानंतर सरकारनेही ही वीज बिल भरण्याच्या बाबतीत काही अंशी सूट देऊ, अथवा गत वर्षी मध्ये मार्च ,एप्रिल ,मे या तीन महिन्यांत जी बिल आले होते.त्यांची सरासरी देऊ असे म्हटले होते. असे असले तरी सप्टेंबर महिना उजाडला तरी अद्यापही बिलाची परिस्थिती जैसे थे च आहे.
गत लॉक डाऊन च्या काळात , सर्व काही बंद होते, यामुळे अनेक जण आर्थिक संकटात होते, अशा परिस्थितीमध्ये अनेकांना कुटुंबाचे पोट कसे भरावे हा प्रश्न होता, केंद्र सरकार तसेच महाराष्ट्र सरकारने गोरगरिबांना अन्नाची कमतरता पडू नये म्हणून गहू तसेच तांदूळ मोफत दिलेले आहे, येणा-या नोव्हेंबर पर्यंतही स्कीम सुरू राहणार आहे, यामुळे कोणी उपाशी राहणार नाही हे जरी खरे असले तरी, इतर अनेक कामासाठी पैसे लागतात, दवाखाना, किराणा, कपडे, या मूलभूत गरजा यासाठी पैसे लागतात. परंतु गत उन्हाळ्यामध्ये कडक लॉक डाउन असल्यामुळे अनेकांच्या हातात पैसा आला नाही , त्यामुळे गोरगरीब पुढे आर्थिक संकट ओढवले होते, टपरी चालक असतील अथवा हॉटेलचालक असतील, तसेच अन्य छोटे मोठे दुकानदार, यांचेही मोठे नुकसान झाले.
ज्यांनी याच वर्षी नवीन दुकान टाकले, त्यांचे खूप नुकसान झाले, छोट्या व्यापा-यांना आर्थिक मदत करावी अशी मागणीही पुढे आली होती. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यानी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. यामुळे तीन महिन्याच्या कालावधीतील अर्धे वीजबिल माफ होईल अशी अपेक्षा होती. परंतु ग्राहकांना जुने विज बिल अॅड करून पुन्हा बिल येत आहे. आणि हा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक जण वीज बिलात काहीतरी सवलत मिळेल या आशेवर अनेकांनी बिल भरलेले नाही. यामुळे बिल वाढतच आहे.
आता शासनाने यावर काहीतरी निर्णय घेण्याची गरज आहे. वीज बिलात सवलत द्यावी अन्यथा ग्राहकांनी आहे तेवढे वीज भरावे अथवा सवलत मिळणार नाही असे तरी सांगावे म्हणजे ग्राहकांना काही तर तडजोड करुन पैसे भरता येतील प्रतिक्रिया ग्राहकांतून व्यक्त केली जात आहे
सरकारने दिलेले आश्वासन पाळावे
सरकारने वीज बिल माफ करण्याचे आश्वासन दिले होते ते तरी सरकारने पाळायला हवे होते परंतु अद्यापही गरीबांचे वीजबिल माफ झालेले नाही, सरकारने निदान वीज बिलात सवलत देऊन गरिबांना आधार देण्याची गरज आहे.
– बाळासाहेब शिवशेट्टे
(मनसे तालुकाध्यक्ष जळकोट )
राज्यातील कोरोनाबधितांची संख्या १० लाखांपुढे, २४ तासात २४ हजार ८८६ नवे रुग्ण !