निलंगा : शहरातील दर्गा दादापीरनगर व चांदसाबी मोहल्ला या भागातील पाणीपुरवठा नगरपालिकेने ऐन उन्हात अचानक बंद केल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकत फिरावे लागत आहे. यामुळे नागरिकांनी आक्रोश करीत पाणीपुरवठा सुरळीत करावा म्हणून पालिकेचे प्रशासक उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांना निवेदन दिले .
जिल्हा वक्फ कर्मचा-यांच्या पत्राचा आधार घेऊन नगरपालिका कर्मचारी पाणी, स्वच्छता, व मूलभूत विकासापासून नागरिकांना वंचित ठेवत आहेत. या व अन्य नागरी सुविधाबाबतीत शहरातील नागरिक व महीलांच्या वतीने नगरपालिकेचे प्रशासक म्हणून असलेले उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांना निवेदन दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी जाधव यांनी तात्काळ पाणीपुरवठा पूर्ववत सुरू राहील असे सांगितले. व उर्वरित मागण्या बाबतीत गांभीर्याने विचार करून सोडविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी माजी पं स. सभापती अजीत माने, माजी नगराध्यक्ष हमीद शेख,भटक्या विमुक्त जाती संघटनेचे विलास माने, ओबीसी नेते दयानंद चोपणे, आर पी आय नेते विलास सूर्यवंशी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष इस्माईल लद्दाफ, असगर अन्सारी, मौलाना नसरुद्दीन, शिवसेनेचे हरिभाऊ सगरे, खाजामीया सौदागर, सबदर कादरी, मुन्नाबी मोमीन, मुस्तफा शेख, शफी सौदागर, अहेमद शेख आदींसह नागरिक उपस्थित होते.