18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeलातूरप्रभाग रचनेत २२ तीनचे तर एक प्रभाग चार सदस्यांचा

प्रभाग रचनेत २२ तीनचे तर एक प्रभाग चार सदस्यांचा

एकमत ऑनलाईन

लातूर : राज्यातील महानगरपालिकेची प्रभाग रचना तीन सदस्यीय करण्यावर मंत्रीमंडळाने शिक्कामोर्तब केल्यानंतर राज्य निवडणुक आयोगाने दि. ५ ऑक्टोबर रोजी प्रभाग रचना कच्चा आरखडा तयार करण्याचे आदेश महानगरपालिकेला दिले आहेत. त्यानूसार आता लातूर महानगरपालिकेच्या प्रशासनाने नवीन प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरु केली आहे. शहरात आता नव्याने २३ प्रभाग होणार आहेत. त्यात २२ प्रभाग तीन सदस्यांचे तर एक प्रभाग चार सदस्यांचा असणार आहे.

विद्यमान महानगरपालिकेची सदस्य संख्या ७० आहे. नवीन रचनेतही सदस्य संख्या ७० च राहणार आहे. सध्या चार सदस्यीय प्रभाग रचना होती. त्यात १८ प्रभाग होते. आता नवीन रचनेत २३ प्रभाग होणार आहेत. यात २२ प्रभाग हे तीन सदस्यांचे असतील तर एक प्रभाग हा चार सदस्यांचा असणार आहे. अनुक्रमांक २३ हा प्रभाग चार सदस्यांचा राहण्याची शक्यता आहे. निवडणुक आयोगाच्या सूचनेनूसार महानगरपालिकेची प्रभाग रचनेची दिश ठरवली जाणार आहे. यात प्रभाग रचना सुरु करताना सर्व प्रथम उत्तर दिशेकडून सुरुवात करण्यात येणार आहे. उत्तरेकडून ईशन्य (उत्तर पूर्व) त्यानंतर पूर्व दिशेकडे येऊन पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रभाग रचना करत याचा शेवट दक्षिण दिशेकडे काढला जाणार आहे. प्रभागांना क्रमांकही त्याच पद्धतीने दिले जाणार आहेत.

राज्यभरात मागील अनेक निवडणुकांत क्षेत्रीय अधिका-यांकडून अनेकदा चूका झाल्याचे राज्य निवडणुक आयोगाला दिसून आले आहे. राजकीय दबावाला बळी पडून अयोग्य प्रकारे प्रभाग रचना केली जाते. याच्या याचिकाही न्यायालयात दाखल होतात. हे लक्षात घेऊन आता महानगरपालिकेने केलेल्या प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा निवडणुक आयोगाकडून तपासला जाणार आहे. त्यामुळे महानगरपालिकेची जबाबदारी वाढली आहे.

आता प्रभागांना क्रमांकासह नावही देणार
प्रभाग रचनेमध्ये प्रभागांना अनुक्रमांक देण्यत येतात. प्रभागाचे क्षेत्र चटकन लक्षात यावे, याकरीता प्रभागांना अनुक्रमांकासोबतच प्रभागाचे नाव देण्याचे अधिकार निवडणुक आयोगाने महानगरपालिका आयुक्तांना दिले आहेत. पण प्रभागांना नाव देणे हे बंधनकारक नाही. तरीदेखील प्रभागांना नाव देता येईल काय? हे तपासूुन पाहावे, असे आदेशाही निवडणुक आयोगाने दिले आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या