32 C
Latur
Tuesday, March 9, 2021
Home लातूर शिरूर अनंतपाळ तालुक्यावर जलसंकट?

शिरूर अनंतपाळ तालुक्यावर जलसंकट?

एकमत ऑनलाईन

शकील देशमुख शिरुर अनंतपाळ : पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटत असतानाही अद्याप दमदार असा मोठा पाऊस पडला नसल्याने तालुक्यातील प्रकल्पासह नदी-नाले कोरडेठाक पडले आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीपासून पिकांपुरता हलका पाऊस पडत असून यापुढे अशीच परिस्थिती कायम राहिल्यास शिरूर अनंतपाळ तालुक्­यावर जलसंकट ओढावण्याची शक्­यता नाकारता येणार नाही.

या वर्षी तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार एंट्री केल्याने यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल, अशी अपेक्षा असताना त्यानंतर एक ही मोठा पाऊस पडला नाही. त्यात मृगात पडलेल्या हलक्या पावसावर मृगाच्या पेरण्याही झाल्या, त्यानंतर पिकापुरते पाऊस पडत असल्याने सध्या सर्वच खरीप पिके चांगलीच बहरली असली तरी अद्यापपर्यंत मोठा पाऊस पडला नसल्याने पाण्याचे सर्व स्त्रोत कोरडेच आहेत. शिरूर अनंतपाळ तालुका हा प्रकल्पाचा तालुका म्हणून ओळखला जातो.

घरणी, साकोळ, पांढरवाडी , उमरदरा यांसह डोंगरगाव बॅरेज असून त्यातून तालुक्याची तहान भागते. पण सध्या मोठा पाऊस पडला नसल्याने प्रकल्पासह नद्यानाले कोरडेठाक पडले आहेत. यामुळे तालुकावासीयांचीचिंता वाढली आहे.
तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ७१५ मिमी एवढे असून गेल्या दोन महिन्यात फक्त३९४ मिमी एवढा पाऊस पडला आहे. त्यात शिरूर अनंतपाळ महसूल मंडळात ४११ मिमी, साकोळ महसुल मंडळात ३९० मिमी, तर हिसामाबाद महसूल मंडळात ३८३ मिमी एवढा पाऊस पडला आहे.

तालुक्यात अद्याप मोठा पाऊस पडला नसल्याने घरणी, साकोळ मध्यम प्रकल्प तर पांढरवाडी, उमरदरा, डोंगरगाव, गिरकचाळ बॅरेज व पाझर तलावासह सर्व नदी-नाले पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत, अशात दमदार पाऊस पडला नाही तर तालुक्यात पाणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण होईल की काय जाणकारांतून व्यक्त केली जात आहे.

सुशांतवर सफेद जादूने केले उपचार ; सुशांत केसमध्ये एका गूढ आध्यात्मीक बाबाची एंट्री

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,444FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या