24.8 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeलातूरअनेक वर्षांनंतर जूनमध्ये मांजरा प्रकल्पात वाढले पाणी

अनेक वर्षांनंतर जूनमध्ये मांजरा प्रकल्पात वाढले पाणी

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर शहराला पाणीपुरवठा होणा-या केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा प्रकल्पात सहसा जूनमध्ये पाणी वाढत नाही; परंतु यंदा जूनमध्ये मांजरा प्रकल्पात १७ जून ते ३० जून या कालावधीत २ दलघमी इतके पाणी वाढले आहे़ सध्या मांजरा प्रकल्पात १८़९६ दलघमी इतके पाणी आहे.

अनेक वर्षांनंतर मृग नक्षत्राच्या प्रारंभीच यंदा पावसाने चांगली सुरुवात केली़ गेल्या अनेक वर्षांत मांजरा प्रकल्पात मृग नक्षत्रात पाणी वाढलेले नव्हते़ यंदा प्रथमच मांजरा प्रकल्पात मृृग नक्षत्रात पाणी वाढले आहे.

दि. १७ जूनपर्यंत मांजरा प्रकल्पात १६़६३ दलघमी इतके पाणी होते़ त्यानंतर मांजरा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसाने दि़ ३० जून रोजी मांजरा प्रकल्पात १८़९६ दलघमी इतके पाणी वाढले आहे़ साधारणत: जुलै-आॅगस्टमधील पावसानेच मांजरा प्रकल्पातील पाण्याची पातळी वाढत असे; परंतु, यंदा जूनमध्येच मांजरा प्रकल्पातील पाण्याची पातळी वाढली आहे़ गत वर्षी मांजरा प्रकल्पात पाणी पातळी वाढण्यासाठी आॅक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागली होती़ यंदा मृगाच्या पावसाने मांजरा प्रकल्पात पाणी पातळी वाढली आहे.

मांजरा प्रकल्प क्षेत्रात बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील काही भाग येतो़ त्या क्षेत्रामध्ये मान्सून बºयापैकी बरसल्याने मांजरा प्रकल्पातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे़ पडणाºया पावसात सातत्य राहिले तर मांजरा प्रकल्पातील पाणी साठ्यात मोठी वाढ होऊ शकते़ आजघडीला मांजरा प्रकल्पात १८़९६ दलघमी इतका पाणी साठा आहे़ हे पाणी लातूर शहराला सप्टेंबरअखेरपर्यंत पुरवठा होऊ शकते, अशी माहिती महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे अभियंता विजयकुमार चोळखणे यांनी दिली.

२१ महिन्यांपासून मृत जल साठ्यातूनच शहराला पाणीपुरवठा
लातूर शहराला पाणीपुरवठा होणाºया मांजरा प्रकल्पातील उपयुक्त पाणी साठा दि़ २७ सप्टेंबर २०१८ रोजी संपला होता़ तेव्हापासून आजपर्यंत म्हणजेच गेल्या २१ महिन्यांपासून लातूर शहराला प्रकल्पातील मृत पाणी साठ्यातूनच पाणीपुरवठा होतो आहे़ प्रकल्पातील उपलब्ध पाणी जास्तीत जास्त दिवस पुरवठा करता यावा म्हणून महानगरपालिकेने नियोजन केलेले आहे़ या नियोजनाचा एक भाग म्हणून आजही लातूर शहराला महिन्यातून तीन वेळा पाणीपुरवठा केला जातो आहे़ यंदा पावसाळा आतापर्यंतच बºयापैकी दिसतो आहे़ या पुढच्या दोन-तीन महिन्यांत आणखी चांगला पाऊस पडला तर मांजरा प्रकल्प पूर्णत: भरेल आणि लातूरकरांना मुबलक पाणी मिळेल.

Read More  भक्तांविना वारी पंढरीची

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या