24 C
Latur
Monday, June 21, 2021
Homeलातूरपाणी बचतीचा 'मांजरा पॅटर्न' तयार व्हावा

पाणी बचतीचा ‘मांजरा पॅटर्न’ तयार व्हावा

धिरज देशमुख यांची अपेक्षा; बाभळगाव येथील समाधीस्थळाचे, मांजरा धरणाची केली पाहणी

एकमत ऑनलाईन

लातूर : मांजरा धरण भरले म्हणून पाण्याचा बेसुमार वापर होऊ नये. पुढच्या 3 ते 4 वर्षांपर्यंत हे पाणी कसे टिकेल, याचे सुक्ष्म नियोजन करावे. या कामात जलसंपदा विभागाने लोकसहभाग वाढवून पाण्याच्या योग्य वापराबाबतचा आणि पाणी बचतीचा ‘मांजरा पॅटर्न’ तयार करावा, असा सूचना आमदार मा. धिरज विलासराव देशमुख यांनी शनिवारी दिल्या.

24 ऑक्टोबर हा विधानसभेचा निकाल जाहीर झाला तो दिवस. या दिवसाचे औचित्य साधून आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या बाभळगाव येथील समाधीस्थळाचे आमदार मा. धिरज देशमुख यांनी दर्शन घेतले. मांजरा कारखाना येथील साहेबांच्या पुतळ्यासही त्यांनी अभिवादन केले. याबरोबरच त्यांनी आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या दूरदृष्टीकोनातून साकारलेल्या आणि लातूरकरांची जीवनवाहिनी असलेल्या मांजरा धरणाची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.

धिरज देशमुख म्हणाले, लोकसंख्या वाढत आहे. उद्योग वाढत आहेत. तशी पाण्याची गरज वाढत आहे. पण, पाण्याची साठवण क्षमता आहे तशी आहे. त्यामुळे बॅलेन्स साधणे अत्यंत गरजेचे आहे. पाणी टंचाई जाणवू लागली की आपण टँकरने पाणी पुरवठा करतो. रेल्वेने पाणी आणण्याची वेळही आपल्यावर आली होती. या सगळ्या परिस्थितीचा विचार करून आधुनिक पद्धतीने शेती करीत, पाण्याची गळती आणि नासाडी थांबवत, पाण्याच्या पुनर्वापर करीत असलेल्या पाण्याची बचत करायला शिकले पाहिजे. त्यासाठी जनजागृती वाढायला हवी. पाण्याची बचत हा विचार जीवनशैलीचा एक भाग बनला पाहिजे.

गेल्या तीन-चार वर्षात फारसा समाधानकारक पाऊस झाला नाही. पाण्याचा अल्प साठा होता, अशा परिस्थितीत कुठल्या अडचणी होत्या, त्याचा सामना कसा केला, त्याचे नियोजन कसे केले याचा अभ्यास करून सध्या धरणात असलेले पाणी अधिक दिवस वापरता येईल, असे सांगून आमदार धिरज देशमुख म्हणाले, नव्या पिढीने आधुनिक शेतीकडे वळायला हवे. शेतीत नवनवे प्रयोग करायला हवेत. नोकरी नाही म्हणून निराश होऊन बसण्यापेक्षा असलेल्या संधीचे सोने करायला हवे.

यावेळी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता व प्रशासक अभिजित म्हेत्रे, मांजरा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्रीशैल्य उटगे, रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, लातूर पंचायत समितीचे सभापती प्रताप पाटील, उपसभापती प्रकाश उफाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

महाळुंग येथील यमाईदेवी मंदिर परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या