27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeलातूरआठ तालुक्यांत पाणीटंचाईच्या झळा

आठ तालुक्यांत पाणीटंचाईच्या झळा

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हयात गेल्यावर्षी सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाल्याने जिल्हयात एप्रिल अखेर पर्यंत पाणी टंचाई जानवली नाही. मात्र मे महिना उजाडताच ग्रामीण भागात पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या. ग्रामीण भागातील नागरीकांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबावी म्हणून जिल्हयातील २५ गावांसाठी व ९ वाडया, तांडयावरील नागरीकांसाठी पाणी मिळावे म्हणून पंचायत समिती स्तरावर ३५ अधिग्रहाणाची मागणी करण्यात आली आहे.

लातूर जिल्हयात गेल्यावर्षी जून महिना अखेर पर्यंत पाणी टंचाईच्या झळा जाणवल्या. पावसाळयात ब-याच ठिकाणी सम विषम स्वरूपात पाऊस झाला होता, असे असले तरी जिल्हयात गेल्यावर्षी सरासरी पेक्षा अधिक पाऊस झाल्याने पाणी टंचाई संपुष्टात येऊन ग्रामीण भागातील नागरीकांनाही दिलासा मिळाला होता. जिल्हयात गेल्यावर्षी चांगला पाऊस झाल्याने यावर्षी एपिल अखेर पर्यंत जिल्हयात पाणी टंचाई जाणवली नाही. मात्र मे उजाडताच ग्रामीण भागातून ग्रामपंचायतीकडून पाणी टंचाइचे प्रस्ताव पंचायत समितीच्याकडे येऊ लागले आहेत. जिल्हयातील २५ गावांसाठी व ९ वाडया, तांडयावरील नागरीकांसाठी पाणी मिळावे म्हणून पंचायत समिती स्तरावर ३५ अधिग्रहाणाचे प्रस्ताव दाखल झाले आहेत.

यात लातूर तालुक्यातील कृष्णनगर तांडयासाठी १ अधिग्रणांची मागणी, औसा तालुक्यातील २ वाडया व २ गावांसाठी ४ अधिग्रहणाची मागणी, निलंगा तालुक्यातील १ गावासाठी २ अधिग्रहणांची मागणी, रेणापूर तालुक्यातून २ गावांसाठी २ अधिग्रहणांची मागणी, अहमदपूर तालुक्यील १४ गावे व ६ वाडयासाठी २० अधिग्रहणाची मागणी, चाकूर तालुक्यातील २ गावांसाठी २ अधिग्रहणांची मागणी, उदगीर तालुक्यातील ३ गावांसाठी ३ अधिग्रहणांची मागणी, तर जळकोट तालुक्यातील मेवापूरसाठी १ अधिग्रहणाच्या मागणीचा प्रस्ताव पंचायत समितीच्या स्तरावर करण्यात आले आहेत. या गावातील नागरीकांना पाणी टंचाईच्या झळा जानवत आहेत.

चार गावे, दोन वाडयांना अधिग्रहणाद्वारे पाणी पुरवठा
लातूर जिल्हयात गेल्यावर्षी जवळपास १०० पेक्षा जास्त अधिग्रहणाद्वारे जून अखेर पर्यत पाणी पुरवठा करण्यात येत होता. यावर्षी मे मध्ये अहमदपूर तालुक्यातील चार गावांना व दोन वाडयांना अधिग्रहणाद्वारे पाणी पुरवठा करण्याच्या प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली आहे. त्यानुसार ग्रामीण भागातील नागरीकांना सहा अधिग्रहणाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या