22.7 C
Latur
Wednesday, August 12, 2020
Home लातूर उद्यापासून शहराला ७ दिवसाआड पाणी पुरवठा

उद्यापासून शहराला ७ दिवसाआड पाणी पुरवठा

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर शहराल पाणीपुरवठा होणा-या धनेगाव येथील मांजरा धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठा दि. १ ऑगस्ट रोजी ३९.२९ दलघमी (१७.५४ टक्के) झाला आहे. त्यामुळे उद्या दि. २ ऑगस्टपासून लातूर शहराचा पाणीपुरवठा ७ दिवसाआड एक वेळा करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून सोमवार ते सोमवार, मंगळवार ते मंगळवार, अशा वारांनूसारच पाणीपुरवठा केला जाणार आहे.

सोमवार दि. ३ ऑगस्ट रोजी शासकीय कॉलनी जलकुंभावरुन श्रीनगरचा काही भाग, (पीर टेकडी), सोहेलनगर, हरदेवनगर, दीपज्योतीनगर, अजिंठानगर, शंभूनगर, हडको कॉलनी, विठ्ठल-रुक्मिणीनगर, सय्यदनगर, अवंतीनगर. बसवेश्वर जलकुंभावरुन एलआयसी कॉलनी, कन्हेरीगाव, पटेलनगर, माताजीनगर, मोतीनगरचा काही भाग, कव्हा रोड, पोष्टल कॉलनी, संभाजीनगर, शंकरपुरम्, मंत्री पुर्वभाग. राजधानी जलकुंभावरुन सिग्नल कॅम्प, शिवनगर, पत्रकार रोड, सुतमिल रोड, विवेकानंदपुरम्, कोकाटेनगर, बोधेनगर, टागोरनगर, श्विाजी नगर, ठाकरे चौक, जयक्रांती कॉलेज, गांधीनगर, गजानननगर, खोरीगल्ली, वडरवाडा, सावेवाडी, दिनानाथनगर, टिळकनगर, मित्रनगर, एम्लॉयमेंट कार्यालय, बिग रमा चित्र मंदीर, काळे हॉस्पीटल, कापड मिल, हमालगल्लीचा काही भाग, महात्मा बसवेश्वर कॉलेज. आर्वी जलकुंभावरुन अजिंक्य सिटी, बिसेननगर, मयुरबन कॉलनी, काथवटेनगर, बेळंबेनगर, बालाजीनगर, आदित्य संस्कृती, आर्वी गायरान, भगवानबाबा नगर, हनुमाननगर, सोमवंशीनगर, गडदेनगर, म्हैसूर कॉलनी, धायगुडेनगर.

दि. ४ ऑगस्ट रोजी शासकीय कॉलनी जलकुंभावरुन वाल्मिकीनगर, गिरवलकरनगर, पंचवटीनगर, न्यु. भाग्यनगर, पठाणनगर, आम्लेश्वरनगर, चौधरीनगर, कुलस्वामीनीनगर, सोनानगर. बसवेश्वर जलकुंभावरुन मंत्रीनगर पश्चिम भाग, अंबिकानगर, ज्ञानेश्वर नगर, एलआयसी कॉलनीचा काही भाग, इंद्रायणीनगर, विराट हनुमान, कृषी कॉलनी, आदर्श कॉलनी, नारायणनगर, पशुपतीनाथनगर, श्रीनगर, पारिजात मंगल कार्यालयामागे, औसरोड. मजीप्रा जलकुंभावरुन श्रीनगर, दत्त मंदीर, भारती क्लासेस, शिवनगर, मंदाडे हॉस्पिटल, शिवगंगानगर, क्रांतीनगर, वडरगल्ली, अग्रोयानगर, कपीलनगर, स्वामी समर्थनगर, नेताजीनगर, सैनिकपुरी कॉलनी. आर्वी जलकुंभावरुन इंडियानगर, केशवनगर, हुसेनिया कॉलनी, एस. टी. कॉलनी, सुळनगर, बजरंग चौक, टाकेनगर, एलआयसी रोड, अर्धा साई रोड सप्लाय.

बुधवार दि. ५ ऑगस्ट रोजी सरस्वती जलकुंभावरुन गायत्रीनगर, महसूल कॉलनी, सैनिक कॉलनी, वैभवनगर, सौभाग्यनगर, साईधाम, अक्षरधाम, ड्रायव्हर कॉलनी, राघवेंद्र कॉलनी, दत्तकृपा सोसायटी, पत्तेवार कॉलनी, गणेशनगर, कालिकादेवी मंदीर, लक्ष्मी कॉलनी, रामनगर, शाहूपूरी कॉलनी, नारायणनगर, पारिजात कॉलनी, अयोध्या सोसायटी, कोंडदेवनगर. मजीप्रा जलकुंभावरुन आंबेडकर कॉलनी, इंडियानगर, सुभेदार रामजीनगर, बोधी चौक, बँक कॉलनी, शामनगर, रियाज कॉलनी, विशालनगर, टाकेनगर, जाफरनगर, कल्पनानगर, पद्मानगर, संभाजीनगर, खाडगाव रोड. नांदेड नाका जलकुंभावररुन नाथनगर, मळवटी रोड, भारत सोसायटी, गवळीनगर, तुळजापुरेनगर, साईबाबानगर, हिमायतनगर, आदमनगर, सिद्धेश्वरनगर, संत गोरोबा सोसायटी, शास्त्रीनगर, इंदिरानगर, राजीवनगर, पंचवटीनगर, श्रीनगर, साठेनगर, जयभिमनगर, लेबर कॉलनी, मदनी मस्जिद, भंगी कॉलनी, संजयनगर. आर्वी जलकुंभावरुन मित्रनगर, खोरीगल्ली, आयशा कॉलनी, ज्ञानेश्वरनगर, महेबूबनगर, संगीत महाविद्यालय लाईन, जाफरनगर, गुरुकृा कॉलनी, मुक्ताईनगर, अर्धा साई रोड, टाकेनगर.

गुरुवार दि. ६ ऑगस्ट रोजी सरस्वती जलकुंभावरुन तुळजाभवानीनगर गौत्तमनगर, यमुना सोसायटी, सरस्वती कॉलनी, लक्ष्मीधाम, गुलटेकडी, गायत्रीनगरचा काही भाग. नांदेड नाका जलकुंभावरुन सिद्धार्थ सोसायटी, हरिभाऊनगर, स्वातंत्र्य सैनिकनगर, सूर्यवंशीनगर, ताजोद्दिनबाबा रोड, बादाडेनगर, बकरतनगर, गाजीपूरा, बालाजीनगर, सारोळारोड, महादेवनगर, प्रबुद्धनगर, मनियारनगर. मजीप्रा जलकुंभावरुन विकासनगर, खाडगाव रोड, ख्वाजानगर, वाले इंग्लिश स्कुल, विशालनगर, नरहरे क्लासेस, सदाशिवनगर, चौधरीनगर, खोरीगल्ली, वडारवाडा, आदर्श क्लासेस, सूशिलादेवीनगर, साईबाबा मंदीर. आर्वी जलकुंभावरुन शारदानगर, व्यंकटेशनगर, मदनेनगर, अर्धा केशवनगर, रेणूकानगर, उत्कर्ष सोसायटी, भक्तीनगर, रिंगरोड बायपास, सूर्यानगर, बँक कॉलनी.

शुक्रवार दि. ७ ऑगस्ट रोजी नांदेडनाका जलकुंभावरुन बौद्धनगर, साळेगल्ली, मेघराजनगर, आनंदनगर, काझी मोहल्ला, चिल्ले कॉम्पलेक्स, तथागत चौक, शास्त्रीनगर, इस्लामपुरा, अंजलीनगर, म्हाडा कॉलनी. डालडा फॅक्ट्री जलकुंभावरुन मंठाळेनगर, मजगेनगर, पिनाटेनगर, राजश्रीनगर, हणमंतवाडी पुर्ण भाग, मोतीनगर, कोरे गार्डन, कोल्हेनगर, बादाडेनगर, होळकरनगर, तावरजा कॉलनी. गांधी चौक जलकुंभावरुन नांदेड रोड, चंद्रनगर, कामदार रोड. आर्वी जलकुंभावरुन पठाणनगर, होळकरनगर, डॉक्टर कॉलनी, नवरत्ननगर, तिरुपतीनगर, बनसोडेनगर, काशिलिंगेश्वरनगर, नंदधाम सोसायटी, नांदगाव जेल.

शनिवार दि. ८ ऑगस्ट रोजी डालडा फॅक्ट्री जलकुंभावरुन होळकरनगर, बस्तापूरेनगर, इस्लामपुरा, गांधीनगर, मोरेनगर, समता कॉलनी, क्वॉईलनगर, सिंहगड सोसायटी, मोचीगल्ली, कामदार रोड, गौसपूरा, श्रीकृष्णनगर, सिद्धेश्वरनगर. गांधी चौक जलकुंभावरुन पोचम्मागल्ली, आझाद चौक, गंज गोलाई, हत्तेनगर, तेलीगल्ली, रामगल्ली, देशपांडेगल्ली, पटेल चौक, सिद्धेश्वर चौक, वैशालीनगर. रविवार दि. ९ ऑगस्ट रोजी पाणी पुरवठा यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद राहील.

पाणी पुरवठ्याच्या वेळेत २५ टक्के कपात अपरिहार्य
धनेगाव येथील मांजरा धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने सध्या दहा दिवसाआड होत असलेला पाणीपुरवठा सात दिवसाआड करण्यात येणार आहे. तथापि यासाठी पाणीपुरवठ्याच्या वेळेत अर्धा तास (२५ टक्के) कपात करावी लागणार आहे. तसेच काही तांत्रिक बिघाड झाल्यास वेळापत्रकात बदल होऊ शकतो. नागरिकांनी पाण्याचा अपव्यय केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांचे नळ तोडण्यात येणार असुन दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे, असे महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे अभियंता विजय चोळखणे यांनी ‘एकमत’शी बोलताना सांगीतले.

Read More  जो डर गया….सो मर गया…. पहा तुफान व्हायरल व्हिडिओ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,143FansLike
101FollowersFollow