22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूरधनेगाव बॅरेजमधून आज पाणी सुटणार

धनेगाव बॅरेजमधून आज पाणी सुटणार

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
मांजरा नदी काठचे शेतकरी आणि गावक-यांची मागणी लक्षात घेऊन निलंगा तालुक्यातील धनेगाव बॅरेजमधून आज दि. २६ एप्रिल रोजी पाणी सोडण्यात येणार असून मांजरा नदीवरील धनेगाव धरणातूनही लवकरच नदीपात्रात पाणी नियमानुसार सोडण्याची सुचना राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केली आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतकरी व गावक-यांत आनंद व्यक्त होत आहे.

मागच्या वर्षात चांगला पाऊस झाल्याने मांजरा नदीवरील धनेगाव धरणात भरपूर पाणीसाठी उपलब्ध आहे. सद्या उन्हाळयाचे दिवस असून धरणाला लागून असलेल्या बॅरेजमधील पाणीसाठी संपला आहे. नदीपात्र कोरडे पडल्याने नदीकाठच्या उस्मानाबाद, बीड, तसेच लातूर जिल्ह्यातील गाव व परीसरात पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे. पिण्यासाठी, जनावरांसाठी तसेच शेतीसाठी नदीपात्रात धरणातून पाणी सोडावे, अशी मागणी संबंधित गावच्या नागरीकांनी, लोकप्रतिनिधीनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्याकडे केली होती. या मागणीचा विचार करुन नियमाला अनुसरुन हे पाणी सोडण्यात यावे, अशी सुचना पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केली आहे. या सुचना प्राप्त झालेनंतर जलसंपदा विभागाने नदीकाठच्या शेतक-यांकडून शुल्क भरुन घेण्याची प्रक्रीया सुरु केली आहे.

धनेगाव बॅरेज मधून आज पाणी सुटणार
मांजरा नदीवरील धनेगाव बॅरेजच्या खाली टाकळी कोल्हापूरी बंधारा कोरडा पडला असून त्या परीसरातील शेतक-यांनी १.९ लक्ष रूपयाचे शुल्क जलसंपदा विभागाकडे भरले आहे. त्यामूळे आता २६ एप्रिल रोजी प्रत्यक्षात नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता रोहित जगताप यांनी दिली आहे. नदीकाठच्या लोकांनी सावध राहून दक्षता बाळगण्याची सुचनाही त्यांनी केली आहे.

निम्म तेरणा मधूनही पाणी सोडणार
लातूर जिल्हयातील निम्म तेरणा प्रकल्पातुनही पाणी सोडण्याची सुचना पालकमंत्री ना. देशमुख यांनी केली आहे, नियमानुसार शुल्क भरून घेण्याची प्रक्रीया सदया सुरू आहे. त्यामुळे तेरणा नदी पात्रातही लवकरच पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.

संगमवाडी तलावाच्या गेट दुरुस्तीचे काम तात्काळ करावे
संगमवाडी साठवण तलावातुन पाणी सोडण्या करीता चार वर्षापासून प्रलंबीत असलेली गेट दुरुस्ती तात्काळ करुन घ्यावी व त्यानंतर प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात यावे अशी सुचनाही पालकमंत्री अमित देशमुख यांनी केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या