24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeलातूरवाचन संस्कृतीतून आपल्या समाजाची दृष्टी तयार करणं आवश्यक

वाचन संस्कृतीतून आपल्या समाजाची दृष्टी तयार करणं आवश्यक

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
वाचन हे माणसाला समृद्ध बनवतं. माझा प्रवासही लहान लहान गोष्टींची पुस्तके वाचण्यापासुनच झाला मात्र आज तुमच्यासाठी जगप्रसिद्ध प्रतिभावान लोकांबद्दल मी केवळ वाचनामुळे लिहु शकले. वाचन संस्कृतीतून आपल्या समाजाची दृष्टी तयार करणं आवश्यक आहे, असे मत प्रसिद्ध लेखिका दीपा देशमुख यांनी मांडले.

सोमाणी हॉल येथे हरिती बुक गॅलरी व वेध परिवार आयोजित वाचन लेखन प्रवास व अनौपचारिक गप्पा कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी त्यांचा वाचन-लेखन प्रवास सविस्तर मांडला. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, चांगला लेखक तोच होऊ शकतो, जो उत्तम वाचक असतो. वाचनाने माणसात प्रगल्भता वाढते. सर्वांगीण विकासासाठी वाचन हाच प्रभावी मार्ग आहे. यावेळी त्यांनी लिहिलेल्या, सिंफनी, कॅनव्हास, तुमचे आमचे सुपर हिरो, जिनियस या पुस्तकांविषयीचा आपला अनुभव मांडला.

याच कार्यक्रमात दुसरे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित मनोविकास प्रकाशनचे अरंिवद पाटकर यांनी सुशिक्षित समाजाच्या निर्मितीसाठी वाचन आवश्यक असल्याची बाब बोलून दाखवली तसेच मनोविकास प्रकाशन या मार्फत वाचन संदर्भात करत असलेल्या वेगवेगळ्या प्रयोगांची माहिती सांगितली. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक वेध समन्वयक धनंजय कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन राहुल लोंढे व सूत्रसंचालन किरण जगताप यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रेश्मा भवरे, दीपक माने यांनी प्रयत्न केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या