21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeलातूरमाथाडी कामगारांचे सर्व प्रश्न सोडवू

माथाडी कामगारांचे सर्व प्रश्न सोडवू

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्र आमदार अमित विलासराव देशमुख यांची शनिवारी सकाळी बाभळगाव निवासस्थानी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन लातूर शिष्टमंडळाने भेट घेऊन माथाडी कामगारांच्या ग्रॅज्युटी, पीएफच्या संदर्भाने अडचणींची माहिती सांगितली. भविष्य निर्वाह निधीचे कार्यालय इतरत्र हलवू नये, या मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने आमदार देशमुख यांना दिले.

सदरील अडचणी सोडविण्यासाठी कामगारांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, त्यांच्या इतरही समस्या सोडविण्यात येतील, असे आश्वासन या प्रसंगी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी दिले. या शिवाय माथाडी मंडळातील माथाडी कामगारांचा पीएफ फंड, ग्रॅज्युएटी व परतावा रक्कम, केंद्र सरकारच्या पीएफ ऑफिसकडे वर्ग करण्याच्या हालचाली सुरु आहेत, तरी या प्रकरणाची पूर्ण चौकशी करुन हा विषय मार्गी लावावा, पीएफ ऑफिस माथाडी मंडळाकडेच स्थायिक ठेवून सर्व माथाडी कामगारास न्याय द्यावा, अशी विनंती शिष्टमंडळाने केली आहे. यावेळी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी माहिती घेऊन योग्य तो सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. यावेळी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन लातूरचे जिल्हाध्यक्ष शिवाजी कांबळे, माणिक पाडुळे, दिलीप कांबळे, जीवन भालेराव, गोपीनाथ सोनकांबळे, नामदेव मुसाने, दत्ता धुमाळ, अरुणा मोरे, नंदाबाई सूर्यवंशी, शांताबाई धावारे, उषा साबळे आदी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या