22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeलातूरभटक्या विमुक्त जमातीचे सर्व प्रश्न प्राधान्याने सोडवू

भटक्या विमुक्त जमातीचे सर्व प्रश्न प्राधान्याने सोडवू

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
आद्य क्रांतीकारक राजे उमाजी नाईक, कोणत्याही एका समाजापुरते मर्यादित नव्हते, ते एक महान क्रांतिकारक होते, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सर्व समाज घटकांचे संघटन उभारुन त्यांनी इंग्रजी राजवटी विरुद्ध लढा दिला, सामाजिक न्यायाचे राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला, त्यांचे हे कार्य कायम स्मरणात राहण्यासाठी त्यांचे उचित स्मारक उभारले जावे ते आपणाला कायम प्रेरणा देत राहील, असे सांगून भटक्या विमुक्त जमातीचे सर्व प्रश्न सोडवू अशी ग्वाही राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दिली.

येथील बार्शी रोड वसवाडी येथे दि. ७ सटेंबर रोजी भारतीय भटक्या विमुक्त जमाती विकास संघटनेच्या वतीने आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख बोलत होते. त्यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस त्यांनी पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, भारतीय भटक्या विमुक्त जमाती विकास संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. सुधीर अनवले, ओबीसी काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष एकनाथ पाटील, सुखदेव बेरड, व्यंकट पन्हाळे, राजकुमार होळीकर, सूर्यकांत पाटील, लातूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके, लातूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष इम्रान सय्यद, अरुण जाधव, दादाराव भोसले, मारुती झाकडे, उमाजी जाधव, साधू चव्हाण, विक्रम भोसले, मनोहर गायकवाड, उत्तरेश्वर चव्हाण, अमित मुसडगे, लक्ष्मण बोराडे, आदीसह भटक्या विमुक्त जमात समाजाचे नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, भटक्या-विमुक्तांच्या शस्त्रांचे एक संग्रहालय लातूर शहरात करावे, अशी शस्त्रे दुर्मिळ आहेत. हे संग्रहालय करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करु, तसेच राजे उमाजी नाईक यांचा पूर्णाकृती पुतळा लातूर शहरात उभारु, आपला जो इतिहास आहे तो आपण सर्वांनी जपला पाहिज. या समाजबांधवासोबत मी कायम आहे. तुम्हाला सर्वांना न्याय देण्यासाठी मी सदैव तत्पर आहे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय भटक्या विमुक्त जमाती विकास संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. सुधीर आनवले यांनी करुन भटक्या विमुक्त जमातीच्या विविध प्रश्नांची व आतापर्यंतच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यवान कांबळे यांनी केले. कार्यक्रमास भटक्या विमुक्त जमातीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काँग्र्रेस पक्षाने टास्क फोर्स निर्माण करावा
राजे उमाजी नाईक जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देऊन माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले, भटक्या विमुक्त समाजाच्या समस्या व अपेक्षा याची मी नोंद घेतली आहे. भटक्या विमुक्तासाठी आम्ही तत्पर होतो, आहोत आणि उद्याही राहणार आहोत. भटक्या विमुक्तांच्या अनेक जातींच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. समाजातील जो दुबळा मागासलेला आहे, त्यासाठी टास्क फोर्स काँग्रेस पक्षाने निर्माण करावी, अशी सूचना करुन त्यांनी समाजाच्या सर्व अडचणी शासनस्तरावर सोडवण्यासाठी येणा-या विधिमंडळ अधिवेशनात चर्चा करून समस्या सोडवु, अशी ग्वाही दिली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या