19.2 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeलातूरकोरोनाला हरवून आलेल्यांचे औशात स्वागत

कोरोनाला हरवून आलेल्यांचे औशात स्वागत

एकमत ऑनलाईन

संजय सगरे औसा :  कोरोनाला न घाबरता मानसिकदृष्ट्या कणखरपणे सामोरे जाऊन कोरोनाला हरवून घरी परत आलेल्यांचे औशात जंगी स्वागत करण्यात आले. या स्वागताने संबधित कुुटुंबीय भारावून गेले.

एका बाजूला कोरोना झालेल्या व्यक्तीबाबत समाजामध्ये नकारात्मक वृत्ती वाढत आहे बहिष्कृतवृत्ती वाढते आहे, अशा नैराश्यजनक वातावरणात कोरोनाबाधित व्यक्ती व त्यांचे कुटूंबीय, शेजारी यांच्यात सकारात्मकता व उत्साह निर्माण होण्यासाठी दि २३ जुलै रोजी औसा येथील ढोर गल्लीतील कोरोनाला हरवून घरी परत आलेल्या तिघांचे कुटूंबांतील सदस्य, गल्लीतील लोक, शेजारच्या मंडळीनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले आहे. येथील कटकेया कुटूंबांतील ६५ वर्षीय महिला, त्यांचा ४० वर्षीय मुलगा, आठ वर्षीय नात या सर्वांना कोरोनाची बाधा झाली होती. यातील आजी व नात यांना गुरुवारी पाठविण्यात आले.

या दोघांची काळजी घेण्यासाठी कोरोनातून बाहेर पडलेले छोट्या मुलीचे वडील स्वत: अन्य पॉझीटीव्ह रुग्णासोबत आठ दिवस राहिले. या सर्व मंडळींना रुग्णवाहिकेतून घराजवळ आणून सोडण्यात आले तेव्हा शेजारच्या मंडळीनी या कुटूंबाचे फुले उधळून, औक्षण करुन व फटाके वाजवून जंगी स्वागत केले़ या अनोख्या स्वागतास या भागातील नागरीक मोठ्या संख्येनी टाळ्या वाजवत रस्त्याच्या दुतर्फा उभे होते़ या स्वागतामुळे कोरोनामुक्त तिघेही भारावून गेले होते .

प्रशासनाचे लाख लाख आभार
कोरोनावर मात करुन आलेल्या या युवकांने औसा कोव्हिड केअर सेंटरमध्ये अत्यंत चांगली व्यवस्था झाल्याचे सांगितले. आपल्या घरीही एवढी व्यवस्था वेळेवर होऊ शकत नाही तेवढी व्यवस्था शासन , प्रशासनाने केली आहे. तहसीलदार शोभा पुजारी , तालुका आरोग्य आधिकारी डॉ़ आऱ आऱ शेख , वैद्यकीय अधीक्षक डॉ अंगद जाधव , डॉ़ मस्के, डॉ़ सानप, डॉ नागरपूरे , तेथील आरोग्य सेविका , सेवक यांनी अतिशय चांगली सेवा दिली़ त्या सर्वांचे या कुटूंबाने आभार व्यक्त केले आहे. आज या कुटूंबासह पाच जणांना सुट्टी देण्यात आली आहे.

Read More  तिरुका येथे १३१ होम क्वारंटाईन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या