16.6 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeलातूरभक्तीमय वातावरणात बाप्पांचे स्वागत

भक्तीमय वातावरणात बाप्पांचे स्वागत

एकमत ऑनलाईन

लातूर : गेल्या काही दिवसाांसून आतुरतेने वाट पाहणा-या विघ्नहर्त्या, लाडक्या गणपती बाप्पाचे दि. १० सप्टेंबर रोजी वाजत-गाजत उत्साहात आगमन झाले. बाप्पाच्या स्वागतासाठी चिमुकल्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनीच जय्यत तयारी केलेली होती. सर्वत्र चैतन्यमय आणि उत्साही वातावरण संचारले होते. भक्तांच्या आनंदाला उधान आले होते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव नसल्याने परंपरेनूसार घरोघरी बाप्पाची भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली.

‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष, पारंपारिक वाद्यवृंद, ढोल-ताशांचा दणदणाट, गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आतषबाजीत सोमवारी गणरायाचे उत्साही थाटात आगमन झाले. भारतीय संस्कृती जशी सण, उत्सव आणि सोहळ्यांनी सजलेली आहे तसेच ती विविध सांस्कृतीक आणि धार्मिक मुल्यांनी अलंकारीतही आहे. या सण, उत्सवांमध्ये गणेशोत्सवाला विशेष महत्व आहे. या उत्सवामुळे सर्व भाविक भक्तांत उत्साह संचारलेला असतो. विशेषत: तरुणांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. या उत्सवाची जय्यत तयारी गेल्या एक-दिड महिन्यापासूनच होती. त्यामुळे संपूर्ण लातूर शहर बाप्पामय झाले आहे.

शहरातील मारवाडी राजस्थान विद्यालयाच्या पाठीमागील मैदान, शिवाजी चौक, बार्शी रोड, राजीव गांधी चौक, जुना व नवा रेणापूर नाका, सुभाष चौक आदी परिसरात पाच-सहा दिवसांपासूनच गणरायाच्या स्वागातासाठी आवश्यक असणा-या विविध वस्तूंचे स्टॉल्स लावण्यात आलेले होते. गुुरुवारी या स्टॉल्सवर भक्तांची एकच गर्दी झाली. सोमवारी सकाळपासूनच गणेशमुर्ती आणण्यासाठी स्टॉल्सवर गर्दी झाली. ‘श्री’ ची प्रतिष्ठापना घरोघरी झाली. मोठ्या गणेश मंडळांनी गणेशमुर्तींचे बुकिंग करुन ठेवले होते. या मंडळांनी वाजत-गाजत गणेशमुर्त्यां नेऊन प्रतिष्ठापना केली.

‘श्री’ची प्रतिष्ठापना झाली. आता येत्या १० दिवसांत गणेशोत्सव विविध धार्मिक व सामाजिक विधायक उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे. यंदा कोरोनाचे सावट असला तरी गणेश भक्तांमध्ये उत्साह आहे. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थी पर्यंत म्हणजेच १० ते १९ सप्टेंंबर या कालवधीत विविध धार्मिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक कार्यक्रमांचीही रेलचेल असणार आहे.

पूजा साहित्यांचे दर वाढले
श्रीफळ, हळदी, कुंकू, कापूर, अगरबत्ती, अष्टगंध, गुलाल,अक्षता, सुपारी, खारीक, बदाम, हळकुंड, अक्रोड, नवीन कापड, कापसाचे वस्त्र, जानवी, पंचा, तांदूळ, दुर्वा, फुले, पत्री, हार आंब्याची पाने, विड्याची पाने, पंचामृत, कलश ताम्हण, पंचपात्र, नेवैद्य, समई, वाती, निरांजन, आदी ‘श्री’च्या पूजा साहित्यांचे स्टॉल्स थाटले आहेत. मात्र, यंदा पूजा साहित्यांचे दर पाच-दहा टक्क्यांनी वाढले आहेत.

फुलांना सोन्याचा भाव
गणेश चतुर्थीनिमित्त फुलांची मागणी वाढली. एक गुलाब २० रुपयांना विकले गेले. पांढ-या शेवंतीच्या फुलांचा साधा आणि छोटा हार ६० रुपये तर झेंडूच्या फुलांचा छोटा हार २५ रुपयांना होता. चमकीचा लहान हार १० ते ६५ रुपयांना तर मोठा हार ८० ते ९० रुपयांना विक्रीस उपलब्ध होता. गुलाल ३० रुपये, चक्र २० ते ४० रुपये, टोपी १० रुपये, विढ्याची पानं २० रुपये, आसन १५ ते ८० रुपयांपर्यंत विकले गेले. गणेशोत्सवात मोदक या खाद्य पदार्थाला अनन्यसाधारण महत्व असते. ‘श्री’च्या पुजेस मोदक आवश्यक असतात. बाजारपेठेत मोदक २५० रुपये किलो दराने विकले गेले तर पेढाही २५० रुपये किलो होता.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या