औसा : येथील नाथ संस्थानचे पाचवे पीठाधिपती सदगुरु गुरुबाबा महाराज औसेकर यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त झाला. हा मोलाचा पुरस्कार औसेकर महाराज यांना मिळाल्याबदल औसा बाजार समितीच्या वतीने कृषि उत्पन्न बाजार समिती, औसाचे उपसभापती किशोर जाधव यांच्या हस्ते त्यांचा सत्कार नाथ सभागृहामध्ये दि.१३ जून रोजी करण्यात आला.
यावेळी कृषि उत्पन्न बाजार समिती, औसाचे उपसभापती किशोर जाधव , बाजार समितीचे संचालक अशोक जाधव , खरेदी विक्री संघाचे संचालक गणेश माडजे , राजाराम जाधव, सुनील चेळकर, बाजार समितीचे सल्लागार मुस्ताक शेख , प्र.सचिव संतोष हुच्चे , साईनाथ पवार या प्रसंगी उपस्थित होते.