28.2 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeलातूरभीज पावसाचा खरीप पिकांना फायदा

भीज पावसाचा खरीप पिकांना फायदा

एकमत ऑनलाईन

शिरूर अनंतपाळ : शकील देशमुख
शिरूर अनंतपाळ तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून सलग पाऊस पडत आहे. संततधारसह भीज पावसाने तालुका ओलाचिंब झाला असून नदी, नाले वाहते झाले आहेत. सध्या पेरणी व काही ठिकाणी कोळपणी सुरु आहे. या पावसाचा खरीप पिकांना फायदा असून शेतक-यातून समाधान व्यक्त केले जात आहे. यंदा मान्सूनचा पाऊस वेळेवर पडला नसल्याने खरीप पेरण्या उशीरा सुरु झाल्या. त्यात उजेड परिसरात अतिवृष्टीने तर अनेक ठिकाणी बीयांणे उगवले नसल्याने दुबार व तिबार पेरणी करावी लागली. पहिल्या टप्यातील पिकांत कोळपणी तर इतर ठिकाणी आणखीन ही पेरणी सुरु आहे. या मोसमात गेल्या दोन दिवसात समाधान कारक पाऊस पडल्याने खरीप हंगामातील जीवदान मिळाले आहे.

यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच सलग दोन दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली. या दमदार पावसाने शहरासह तालुका ओलाचिंब झाला असून शिरूर अनंतपाळ महसूल मंडळात ३३.८ मिमी, साकोळ ३५ मिमी तर हिसामाबाद महसूल मंडळात ४३ मिमी एवढा पाऊस झाला आहे. तर तालुक्यात सरासरी ३७.५ मिमी एवढया पावसाची नोंद झाली आहे.

आंतरमशागतींच्या कामाला वेग येणार
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत असतानाही पैशाची जुळवाजुळव करत महागलेले खत बियांणे खरेदी करून काळ्या आईची ओटी भरली आहे. आता खरीप पेरणी शेवटच्या टप्यात असून या दमदार पावसाने शेतकरी सुखावला असून पाऊस उघडताच कोळपणी, खुरपणी व फवारणी सह आंतरमशागतींच्या कामाला वेग येणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या