22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeलातूरस्वस्तधान्य दुकानात गहू कमी मिळणार

स्वस्तधान्य दुकानात गहू कमी मिळणार

एकमत ऑनलाईन

उदगीर : बबन काबळे
केंद्र सरकारने सामान्य नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून मिळणा-या गव्हाचे परिमाण केले असुन त्या बदल्यात आता तांदुळ मिळणार आहेत. त्यामुळे आता गरीबांच्या ताटात चपाती एवजी भात अधिक मिळणार आहे . सरकारच्या या निर्णयाचा फटका मात्र गरीबांना बसणार आहे. तालुक्यातील गरीबांना स्वस्त दराने धान्य व किराणा मालाचे वितरण करण्यासाठी १५२ स्वस्त धान्य दुकाने आहेत. तालुक्यातील आंत्योदय कार्ड धारकांची संख्या ४३६८ असून त्यावर २३ हजार ६०९ लोकसंख्या अवलंबून आहे तर प्राधान्य योजनेचे ३५ हजार ५६७ कार्डधारक असून त्यावर १ लाख ८६ हजार ८५२ लोकसंख्या अवलंबून आहे. तर ४ हजार ६८१ शेतकरी कुटंब कार्ड धारक २४ हजार ५७२ लाभार्थी आहेत . कोरोनाच्या सावटामुळे ग्रामिण भागातील अनेक हातावर पोट असलेल्या सर्व सामान्य मजूर व कामगारांना शासनाच्या विविध योजनेतून मिळणारे धान्य व किराणा संजीवनी ठरत आहे. मात्र आता केंद्र सरकारने आता स्वच्छ धान्यातून उपलब्ध असणारे गव्हाचे वाटप कमी करण्याचा निर्णय घेतला आहे .

खुल्या बाजारात गव्हाच्या किमती वाढत चालल्याने बाजारात मागणी व पुरवठा मध्ये तफावत पडली आहे त्यामुळे एका महिन्यात गव्हाच्या किमती कुंटल मागे ३०० ते ४०० रुपये वाढल्या आहेत . अशा परिस्थितीमध्ये सामान्यांना स्वस्तधान्य दुकानाचा आधार होता परंतु आता केंद्र सरकारने गव्हाच्या पुरवठ्यामध्ये कपात केल्याने स्वस्त धान्य दुकानातून सामान्यांना गहू कमी उपलब्ध होणार आहे. गव्हाच्या ऐवजी तांदुळ देणार आहे. अगोदरच तांदुळ अतीशय हलक्या प्रतीचा मिळत असल्याने जनतेत नाराजी होती त्यात आता शासनाच्या या निर्णयाने सामान्यांची थट्टा चालवली असल्याची भावना निर्माण झाली आहे. शासनाने स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे लाभार्थ्यांना एकूण परिमाण हे तेवढेच ठेवले असून गव्हाच्या ऐवजी तांदुळ वाढून मिळणार असल्याचे नायब तहसीलदार शिव शंकर बेंबळगे यांनी सांगितले.

तांदळाचा दर्जा निकृष्ट
मागील काही महिन्यापासून स्वस्त धान्य दुकानातील मिळणारे तांदळाचा दर्जा हा अतिशय खराब आहे या बाबत दुकानदारां कडे तक्रार केली असता तो योग्य उत्तर देत नाही
-मिलींद माणिकराव शिदे उदगीर

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या