Wednesday, September 27, 2023

प्रशासकपदी कोणत्या कार्यकर्त्यांची वर्णी लागणार ?

ओमकार सोनटक्के जळकोट :  जळकोट तालुक्यातील पंचवीस ग्रामपंचायतीच्या मुदती संपल्या आहेत़ यापूर्वी निवडणूक विभागाने या ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्याचे जाहीर केले होते परंतु कोरोना महामारीमुळे या ग्रामपंचायतीच्या निवडणुका रद्द करण्यात आल्या होत्या़ ग्रामपंचायतीच्या मुदती संपल्यानंतर याठिकाणी प्रशासक नेमण्याचा निर्णय महा विकास आघाडी सरकारने घेतला होता. आज २५ जुलै रोजी जळकोट तालुक्यातील २४ ग्रामपंचायतीच्या मुदती संपल्या आहेत, त्यामुळे आता प्रशासकपदी कोणत्या कार्यकर्त्यांची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले आहे.

जळकोट तालुक्यातील घोणसी, ंिचचोली, कोळनुर, (१५जुलै), तिरूका, आतनूर, गव्हाण, शेलदरा, वांजरवाडा (१८जुलै), पाटोदा खुर्द, येलदरा, सुलाळी, कुणकी (१९ जुलै), धामनगाव (२ जुलै) वडगाव (२१जुलै), रावणकोळा मरसांगवी, विराळ, बेळसांगवी, सोनवळा, कोनाळी डोंगर (२३ जुलै), हळद वाढवणा डोंगरगाव बोरगाव खुर्द (२५ जुलै), या २३ ग्रामपंचायतीच्या मुदती संपलेल्या आहेत तर लाळी बु़ ग्रामपंचायतीची मुदत २७ जुलै रोजी संपणार आहे.

या  व्यतिरिक्त मेवापूर आणि शिवाजीनगर तांडा या ग्रामपंचायतीच्या मुदती नोव्हेंबर महिन्यामध्ये संपणार आहेत.
ग्रामपंचायतीच्या मुदती संपल्यामुळे आता या ठिकाणी एक तर निवडणूक होणे गरजेचे आहे ंिकवा प्रशासक म्हणून नियुक्ती करणे गरजेचे आहे, सद्यस्थिती निवडणूक घेणे शक्य होणार नसल्यामुळे शासनाने ग्रामपंचायतीच्या प्रमुखपदी प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासकपद नेमणे अंतिम टप्प्यात आले होते परंतु काही सरपंच संघटना, तसेच सामाजिक संघटना, विरोधी पक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी या निर्णयाला विरोध केला होता, तसेच न्यायालयामध्ये देखील या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते.

दि़ २३ जुलै रोजी प्रशासक नेमण्याचा निर्णय आला न्यायालयाने स्थगिती दिल्याचे बातम्याही सोशल मीडियावर फिरत होत्या, तसेच या निर्णयाला कुठलीही स्थगिती नसल्याचे बातम्या तसेच व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत होते, तसेच ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना पत्र लिहिलेले आहे़ यामध्ये प्रशासन निर्णयांमध्ये कुठलाही राजकीय हेतू नसल्याचे सांगितलेले आहे़ असे असले तरी शासनाने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर तात्काळ प्रशासक नेमण्याची गरज आहे़ अद्यापर्यंत आहेत ते ग्रामपंचायतीचे सरपंच गावामध्ये काम पाहत आहेत ही एक जमेची बाजू आहे. जर मुदत संपली म्हणून ग्रामपंचायती बरखास्त केले असते तर मोठी अडचण निर्माण झाली असती.

Read More  फिजीकल डिस्टन्ससाठी चापोलीत स्वयंशिस्त

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या