23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeलातूरकोणता तालुका मारणार बाजी? याची उत्सुकता

कोणता तालुका मारणार बाजी? याची उत्सुकता

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात भरवण्यात आलेली ‘लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप : ग्रामीण टी १०’ ही भव्य स्पर्धा आज दि. २३ मे पासून जिल्हास्तरावर रंगणार आहे. प्रत्येक तालुक्यातील एक संघ या स्पर्धेत पात्र ठरला असून यापैकी कोणता संघ आता जिल्हास्तरावर अव्वल ठरणार? याची तरुणाईत उत्सुकता आहे.

लोकनेते, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या ७७ व्या जयंतीचे औचित्य साधून आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या पुढाकाराने लातूर जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमी तरुणांसाठी ‘लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप : ग्रामीण टी १०’ ही भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. १३ मे पासून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात ही स्पर्धा सुरु आहे. आता लातूर येथील क्रीडा संकुल येथे २३ ते २५ मे या कालावधीत जिल्हास्तरीय स्पर्धा रंगणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात प्रथम आलेला विजयी संघ या जिल्हास्तरीय स्पर्धेत उतरला आहे. जिल्हास्तरावर प्रथम आलेल्या संघास १ लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक देऊन गौरविले जाणार आहे. द्वितीय पारितोषिक हे ५१ हजार तर तृतीय पारितोषिक ३१ हजार रुपयांचे दिले जाणार आहे. यासोबतच मालिकावीर (३,१०० रुपये), उत्कृष्ट फलंदाज (२,१०० रुपये), उत्कृष्ट गोलंदाज (२,१०० रुपये) अशी पारितोषिके दिली जाणार आहेत.

पारितोषिक वितरण सोहळा सहकारमहर्षी व माजी मंत्री दिलीपराव देशमुख, लातूर ज्ािंल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या