22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeलातूरकोरोनाची भिती आता कशाला? आम्हीच बदलू आम्हाला...!

कोरोनाची भिती आता कशाला? आम्हीच बदलू आम्हाला…!

एकमत ऑनलाईन

लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेऊन जवळपास दिडवर्षे ८ वी ते १२ वी पर्यंतची बंद असलेली शहरातील औद्योगिक परिसरात असलेल्या किसान शिक्षण प्रसारक मंडळाची जिजामाता विद्यालय ही शाळा दि. ४ ऑक्टोबर रोजी पूर्ववतसूरु झाली. तेव्हापासून एकही विद्यार्थी व शिक्षक पाँजिटीव्ह आला नाही. शिक्षकांचा व विद्यार्थ्यांचा आनंद द्विविगुनित होऊन गगनात मावेनासा झाला. कोरोनाची भिती आता कशाला? आम्हीच बदलू आम्हाला…!, अशी शपथ विद्यार्थ्यांनी घेतली आहे.

आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहिकडे…! असे वातावरण सर्व विद्यालय परिसरात दिसून आले. केंद्र व राज्य शासनाने ठरवून दिलेल्या कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या नियम व अटींच्या अधीन राहून मराठवाड्याचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण विद्यालयास रंगरंगोटी करण्यात आली. विद्यालयातील सर्व वर्गाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. वर्गातील डेक्स व फर्निचर यांनादेखील रंग देण्यात आला. तसेच विद्यालयाच्या परिसरात शेकडो झाडे लावण्यात आली. मुले व मुली यांच्यासाठी असलेल्या स्वच्छताग्रहांच्या ठिकाणी साबण व सँनिटायझरची व्यवस्था देखिल करण्यात आली आहे. विद्यालयातील शिक्षकांनी कोरोनाचे दोन डोस घेतले आहे तर काहीचा एक डोस झाला.

विद्यालय सुरु झाल्यापासून दररोज विद्यार्थ्यांचे मास्क, तसेच त्यांची थर्मामीटर व आँक्सी मीटरने तपासनी करण्यात येते. मी मास्क वापरणार, मी साबणाने हात स्वच्छ धूणार, मी सामाजिक अंतर पाळणार तसेच मी कोरोना होऊ नये याची खबरदारी घेणार, अशी शपथ विद्यार्थ्यांना प्राचार्या सलीमा सय्यद यांनी दिली. विद्यार्थ्यांना शाळेची एवढी ओढ होती की दररोज विद्यार्थांची उपस्थिती वाढत गेली. विद्यालयातील सर्व शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी खूप मेहनत घेऊन सोशियल डिस्टनसिंगचे नियम पाळत व कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करत शाळा सुरळीतपणे सुरु ठेवण्यासाठी आम्ही पूर्णपणे दक्षता घेत असल्याचे सांगितले. कोरोनाची भिती आता कशाला? आम्हीच बदलू आम्हाला…!

असे म्हणत विद्यार्थी शिकण्यात मग्न झाले……शेवटी….. हेची दान मागतो देवा, कोरोना कायमचा जावा…! हीच भावना शिक्षक आमदार विक्रम काळे, प्राचार्या सलीमा सय्यद, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थांची दिसून आली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या