चाकूर : येथील नवदाम्पंत्याचा राजस्थान मधील कोटा येथे भीषण अपघात झाला होता.त्यात पत्नी मनीषा यांचा मृत्यू झाला होता.तर पती अभिषेक हे गंभीर जखमी झाले होते. पत्नी मनीषा यांच्यावर चाकूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रसंगी पंचक्रोशीतील नातेवाईक, नागरिक उपस्थित होते. अभिषेक माकणे यांच्यावर कोटा येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
येथील रहिवासी अभिषेक माकणे व पत्नी मनिषा माकणे या नवदाम्पंत्यांचा राजस्थानातील कोटा-बोरां हायवे नंबर २७ वर झालेल्या भीषण अपघातात पत्नी मनिषा माकणे यांचा एका रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना १७ जुलै रविवारी घडली.
पती अभिषेक माकणे हे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दु:खद घटनेने चाकूर येथे शोककळा पसरली आहे. चाकूर येथील रहिवासी अभिषेक माकणे यांचे मनिषा माकणे यांच्याशी नुकताच एक महिन्यापुर्वी विवाह झाला होता.अभिषेक हा कोटा येथे एका खाजगी कंपनीत नोकरीस होता. आठ दिवसाूपूर्वीच आपल्या पत्नीस घेऊन कोटा येथे राहण्यास गेला होता. रविवार १७ जुलै रोजी कंपनीला सुट्टी असल्याने माकणे सपत्नीक कोटा बोरां हायवेवरुन दुचाकीवरुन येत असताना मागून येणा-या गुजरात राज्याची नंबरप्लेट असणा-या कारने सीमल्या गावाजवळील कस्बे टोल नाक्यापासून काही अंतरावर त्यांच्या पाठीमागून जोराची धडक दिल्याने १० फुट उंचावर हवेत उडून एका शेतात जाऊन पडली. अभिषेक माकणे यांच्या पत्नी मनिषा या गंभीर जखमी झाल्या होत्या त्यांना उपचारासाठी कोटा येथील एका रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला आहे पती आभिषेक माकणे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर कोटा येथील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.