25.2 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeलातूरमरेंगे अपने मौत से ... हमको क्या करना !

मरेंगे अपने मौत से … हमको क्या करना !

एकमत ऑनलाईन

नांदेड : राज्यात १ मे पासुन कडक निर्बंधासह मुख्याधिका-यांनी संचारबंदीचे आदेश काढले होते. त्या आदेशाला अनुसरून जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी नांदेड जिल्ह्यासाठी संचारबंदीचे आदेश काढत पोलिस प्रशासनाला कडक निर्बंध सुचना दिल्या. परंतू सोमवारी सकाळपासुन प्रमुख रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ दिसुन आल्यामुळे लॉकडाऊन उठला की काय , अशी शासंकता सामान्य नागरिकांत निर्माण झाली. या संदर्भात जिल्हाधिका-यांशी संपर्क साधला असता कुठलाही लॉकडाऊन अद्याप उठलेला नाही.

१५ मे पर्यंत लॉकडाऊन असल्याचे सांगण्यात आले. या संदर्भात जिल्हा प्रशासनाली एका वरिष्ठ अधिका-याची एकमतच्या प्रतिनिधींनी चर्चा केली असता जिल्हा प्रशासनासह पोलिस प्रशासन सातत्याने नागरिकांना आवाहन करीत असतांनाही नांदेडकर ऐकन्याच्या मनस्थीतीत नाहीत. नागरिकांवर हात उचलणे व कडक शिक्षा करण्याचे निर्बंध नसल्यामुळे याचा फायदा घेत नागरिक रस्त्यावर उतरत आहेत. त्यामुळे असेच म्हणावे लागेल की, मरेंगे आपने मौत से … हमको क्या करना !

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली आहे. अशा वेळी मात्र नांदेडकर मोकाट सुटले आहेत. पालकमंत्री ना. अशोक चव्हाणांनी बेंबीच्या देठापासुन ओरडून विनंती करून सांगीतल्या नंतरही नांदेडकर त्यांच्या आदेशाचे पालन करत नसल्याचे उघड झाले आहे. जिल्हा प्रशसानाच्या आदेशाला नांदेडकरांनी केराची टोपली दाखवली आहे. सोमवारी सकाळी वजिराबाद , जुनामोंढा, आयटीआयचौक, अण्णाभाऊ साठे चौक, तरोडानाका, छत्रपती चौक, इतवारा, पिरबु-हान नगर, बरकी चौक आदी भागात नागरिक बिनधास्तपणे वावरतांना पहावयास मिळाले, यांच्यावर पोलिसांचा कुठलाच निर्बंध दिसुन आला नाही. सोशल डिस्टन्सींगचा फज्जा उडवत तोंडाला मास्क देखील लावलेले नव्हते. त्यामुळे येणा-या काळात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता दाट निर्माण झाली आहे.

शहरात अ‍ॅन्टीजेन कमतरता असल्यामुळे तपासणी होत नाही. त्यामुळे रोज आकडेवारी कमी दिसत आहे. केवळ आरटीपीसीआर टेस्ट घेण्यात येत आहे. त्याचा निकाल येण्यास वेळ लागत आहे. तोपर्यंत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. आरटीपीसीआरची टेस्ट कीट उपलब्ध झाल्याशिवाय तात्काळ निकाल कळणार नाही. रोज आकडेवारी कमी येण्याचे कारण आरटीपीसीआर किट नसल्याचे सांगीतले जात आहे. ऑक्सीजनची व्यवस्था झाली असली तरी रेमडीसीयर इंजेक्शनचा पुरवठा देखील कमी होत आहे. रोज नागरिकांना काळ्या बाजारातुन रेमडीसीयर घेण्याची वेळ आली आहे. आजघडीला केवळ नांदेड शहरासाठी १९२ रेमडीसीयरचा पुरवठा झाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडुन देण्यात आली आहे.

पोलिस व जिल्हा प्रशासनाने वेळीच दखल नाही घेतली तर नांदेडात कोरोनाचा स्फोट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासाठी राज्य पातळीवरून विशेष अधिकार प्राप्त करून कडक निर्बंध केल्याशिवाय कोरोनावर अंकुश बसणार नाही, असे मत अनेक वैद्यकीय क्षेत्रात काम करणा-या तज्ञांनी व्यक्त केले आहे.

सोशल डिस्टेन्सींगचा उडाला बोजवारा; परभणी बाजारपेठेत खरेदीसाठी उसळली नागरिकांची गर्दी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या