22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeलातूरकिल्लारी कारखाना सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणार

किल्लारी कारखाना सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणार

एकमत ऑनलाईन

औसा : किल्लारी सहकारी साखर कारखाना सुरू व्हावा यासाठी औसा विधानसभा मतदारसंघातील १२४ ग्रामपंचायतीकडून आमदार अभिमन्यू पवार यांना ठरावाव्दारे साकडे घालण्यात आले आहे. यावेळी हा कारखाना सुरू व्हावा यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची माहिती आमदार अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केला आहे. दि. २१ जुलै रोजी आमदार अभिमन्यू पवार यांच्या औसा येथील निवासस्थानी औसा विधानसभा मतदारसंघातील १२४ ग्रामपंचायतीच्या वतीने किल्लारी साखर कारखाना सुरू करण्याच्या अनुषंगाने ठराव देण्यात आले.

यावेळी झालेल्या बैठकीत किल्लारी कारखाना संघर्ष समितीचे प्रमुख गुंडाप्पा बिराजदार, भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, नगर परिषदेचे गटनेते सुनील उटगे, किल्लारी साखर कारखान्याचे माजी संचालक युवराज बिराजदार, माजी जि. प. सदस्य प्रकाश पाटील, शरद भोसले, शेखर सोनवणे, जयपाल भोसले, इनूस लदाफ, बालाजी जाधव, गोंिवंद भोसले, विलास सगर, काकासाहेब मोरे, संजय कुलकर्णी,दत्ता पाटील, बी. के. माने, शाहाजी सिरसले, युवराज पाटील, ज्ञानेश्वर वाकडे, धनराज होळकुंदे, ओम बिराजदार, बळवंत पाटील, नितीन पाटील, ओम माने, परमेश्वर बिराजदार, जिलानी बागवान, प्रशांत येळनुरे, नारायण इंगळे, नागोराव राठोड, प्रमोद बिराजदार, भरत वेंजणे, बालाजी बिराजदार, सचिन आनसरवाडे आदी उपस्थित होते. किल्लारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी आपण पाच वर्षांपासून प्रयत्न करीत असून शेतक-यांच्या हितासाठी मी कुठेही अडकाठी निर्माण केली नाही. उलट विरोधी पक्षाचा आमदार असतानाही आपण हा कारखाना सुरू करण्यासाठी माझ्या पध्दतीने मदतच केली आहे. मी कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. या उलट तेवढेच प्रयत्न हा कारखाना सुरू होऊ नये यासाठी काही विघ्नसंतोषी लोकांनी प्रयत्न केले.

माझी बांधिलकी शेतक-यांंशी असल्याने शेतकरी हितासाठी आपण कधीही राजकारण केले नाही. किल्लारी कारखाना ४० कोटी देणे आहे. यामुळे बॅका किल्लारी सुरू करण्यासाठी मदत करायला तयार नाहीत. आशा स्थितीत हा कारखाना सुरू करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असून. किल्लारी साखर कारखान्याकडून शिखर बँकेने आगाऊ वसुली केली असून ३० कोटी कारखान्याला परत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगून. यावर्षी चा गळीत हंगामात किल्लारी साखर कारखाना सुरू करण्याचा आपला प्रयत्न आहे. औसा, निलंगा, उमरगा व लोहारा या चार तालुक्यांतील २० हजारांहून अधिक सभासद संख्या असलेल्या व लातूर-उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या हा साखर कारखाना सुरू करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे यावेळी बोलताना आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले.

यावेळी संघर्ष समितीचे प्रमुख गुंडाप्पा बिराजदार म्हणाले की यावर्षी हा कारखाना सुरू करण्यासाठी २० ते २५ कोटी लागणार आहेत. सदर लागणा-या रक्कमेची तरतूद सरकार अथवा इतर बॅकेकडून आमदार अभिमन्यू पवार यांनी करावी. कुठल्याही बँकेचे कर्ज मिळत नसल्याने हा कारखाना सुरू होत नाही. अनेक वर्षांपासून या बंद कारखान्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतक-यांंना दिलासा द्यावा. यावेळी माजी जि.प. सदस्य प्रकाश पाटील यांंनीही मनोगत व्यक्त केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या