22.2 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeलातूरआजपासून शुद्ध पाणी देणार; पिवळेच आले तर पर्यायी व्यवस्था करणार

आजपासून शुद्ध पाणी देणार; पिवळेच आले तर पर्यायी व्यवस्था करणार

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
महानगरपालिका पिवळ्या पाण्यावर गेल्या दीड महिन्यापासून वेगवेगळे प्रयोग करीत आहे. पाण्याचा पिवळसर रंग काही केल्या जात नाही. गुरुवारी पुन्हा पिवळ्या पाण्यावर प्रयोग करण्यात आले आहेत. यात यश येण्याची शक्यता असल्यामुळे आज दि. १३ मे पासून शहराला शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जाईल. त्यानंतरही पाण्याचा रंग पिवळाच राहिला तर पर्यायी व्यवस्था करुन शहराला शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त अमन मित्तल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

गेल्या दीड महिन्यापासून लातूर शहराल पिवळे पाणी येत आहे. ते कशामुळे झाले, त्यावर काय काय उपाययोजना केल्या आणि त्याउपरही पाणी पिवळेच राहिले तर शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी करण्यात आलेली पर्यायी व्यवस्था याची माहिती देण्यासाठी आयुक्त अमन मित्तल यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधला. ते म्हणाले की, मांजरा धरणातन्ूा रॉ वॉटर घेतले जाते. ते रॉ वॉटर हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्रात घेऊन तेथे पाणी शुद्ध केले जाते.

शुद्ध पाण्याचा पुरवठा लातूर शहराला केला जातो परंतु, गेल्या दीड महिन्यापासून शहराला पिवळे पाणी येत आहे. पाण्याचा पिवळा रंग नाहिसा करण्याकरिता महानगरपालिकेने आतापर्यंत पीएसी पावडरचा वापर, तुरटीचा वापर केला आहे. परंतु पाण्याचा पिवळसर रंग काही गेला नाही. तरीही प्रशासनाकडुन पिवळसर पाण्­याबाबत आवश्­यक त्­या उपाययोजना युध्­दपातळीवर सुरू आहेत. गुरुवारी परत एकदा पिवळसर पाण्याच्या विविध चाचण्या करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आजपासून शहराला शुद्धपाणी देणार परंतु, तरीही पिवळेच पाणी आले तर पर्यायी व्यवस्था करुन शहराला शुद्धपाणी पुरवठा केला जाईल.

शहराला शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे ही महानगरपालिकेची प्राथमिकता आहे. त्यामुळे प्रशासनाकडुन पिवळसर पाण्­याबाबत उपाययोजना केल्या जात आहेत. पिवळसर पाण्याचा रंग नाहीच गेला तर शहराला टँकरद्वारे शुद्धपाणी पुरवठा करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी एमआयडीसीतून पाणी घेतले जाणार आहे, असेही आयुक्त मित्तल म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या