27 C
Latur
Wednesday, November 25, 2020
Home लातूर उद्यापासून शाळेची घंटा वाजणार? संमतीपत्राबाबत पालक संभ्रमात

उद्यापासून शाळेची घंटा वाजणार? संमतीपत्राबाबत पालक संभ्रमात

एकमत ऑनलाईन

लातूर : महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानूसार लातूर जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थेतील नववी ते बारावीचे वर्ग उद्या दि. २३ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे.त. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालकांकडून पाल्यांचे संमतीपत्र घेण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे पालक संभ्रमात तर विद्यार्थी गोंधळात असल्याची सद्य:स्थिती आहे. उच्च माध्यमिकच्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमतीपत्रास प्रतिसाद मिळत असला तरी माध्यमिकच्या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये आपल्या पाल्याविषयी धाकधुक आहे.

एप्रिल २०२० पासून लातूर जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रवेश झाला. प्रारंभीचा काही काळ कोरोनामुक्त असलेला लातूर जिल्हा पाहता पाहता कोरोना विषाणुच्या कवेत सापडला. गेल्या आठ महिन्यांत लातूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या २१ हजार १२५ पर्यंत गेली. त्यातील उपचार घेऊन बरे झालेल्याची संख्या २० हजार २३८ एवढी आहे. होम आयसोलेशनमध्ये १०७ रुग्ण आहेत तर रुग्णालयांत दाखल असलेल्यांची संख्या १४५ आहे असून ६३५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या सूचनांनूसार लातूर जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविल्या. लॉकडाऊनमध्ये विविध उद्योग, व्यवसाय, प्रार्थनास्थळांसह शाळा, महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली. आता अनलॉकमध्ये टप्प्प्या-टप्प्प्याने सर्व व्यवस्था पुर्वपदावर येत आहेत. उद्या दि. २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा, महाविद्यालयांची घंटा वाजणार आहे.

राज्य सरकारच्या निर्णयानूसार लातूर जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग कामाला लागला आहे. शिक्षण विभागाने सर्व मुख्याध्यापकांना संमतीपत्रांचे वितरण केले आहे. मुख्याध्यापकांनी संमती पत्राचा नमुना पालकांना दिला आहे. ११ वी ते १२ वी वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या सुमारे ६० टक्के पालकांनी संमतीपत्र भरुन मुख्याध्यापक/ प्राचार्यांकडे दिले आहेत तर ९ वी व १० वी वर्गातील विद्यार्थ्यांचे पालक संमतीपत्र भरुन देण्याबाबत संभ्रमात आहेत. केवळ २५ टक्के पालकांनी संमतीपत्र दिल्याचे शिक्षणाधिकारी औदुंबर उकीरडे यांनी सांगीतले. उद्यापासून शाळेत जाणा-या विद्यार्थ्यांचा लेखाजोखा पाहूणच आठवडाभरानंतर बरेच पालक आपल्या मुलाला शाळेत पाठवायचे की नाही? यावर निर्णय घेणार असल्याचे समजते.

शहरातील १०० शाळांतील शिक्षकांच्या कोरोना चाचण्या पुर्ण
लातूर शहरात ९ वी ते १२ वीपर्यंतच्या १३० शाळा आहेत. त्यापैकी १०० शाळांतील इंग्रजी, गणित आणि विज्ञान विषयांच्या ८२६ शिक्षकांपैकी ६०० शिक्षकांच्या कोरोना चाचण्या महानगरपालिकच्या आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात आल्या. ३० शाळांतील २२६ शिक्षकांच्या कोरोना चाचण्या घेण्याचे बाकी आहे. एकुण १२७७ शिक्षकांपैकी ६९९ शिक्षकांच्या रॅपीड अँटिजेन तर ५७८ शिक्षकांच्या आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ३३ शिक्षक कोरोनाबाधित आढळून आले तर ८७ टेस्टचा अहवाल अद्याप यायचा आहे. २३ नोव्हेंबरपूर्वी ९ वी ते १२ वीपर्यंतच्या इंग्रजी, गणित, विज्ञान विषयांच्या शिक्षकांच्या चाचण्या पुर्ण करण्यात येणार असून उर्वरीत शिक्षकांच्या चाचण्या २३ ते ३० नोव्हेंबरपर्यंत केल्या जाणार आहेत. ४० वर्षांपुढील शिक्षकांच्या आरटीपीसीआर तर ४० वर्षांच्या आतील शिक्षकांच्या रॅपीट अँटिजेन टेस्ट करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. महेश पाटील यांनी दिली.

मंगळवेढयाच्या आवताडे कंपनीला ३१ कोटीचा दंड

ताज्या बातम्या

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. करोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर गुरुग्राम येथील मेदांता...

पदवीधरांच्या भाजपा मेळाव्यात कार्यकर्त्यांची गर्दी

लातूर : मराठवाडा पदवीधर मतदार संघ भाजपा व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ लातूर जिल्हा भाजपाच्या वतीने दि. २४ नोव्हेंबर रोजी...

धुमाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कासार सिरसी (नागेश पंडित ) : निलंगा तालुक्यातील नेलवाड येथील भारतीय सैन्य दलातील जवान अर्जुन (लखन) किसनराव धुमाळ (वय २४) हे कश्मीर खो-यात दोन...

क्रिकेटमध्येही घराणेशाही!

मुलाने आपली गादी चालवावी असे प्रत्येक बापाला वाटणे हा मानवी स्वभाव आहे. किमान भारतीयांना तरी तसे वाटू शकते. अर्थात याला अपवादही असू शकतात. डॉक्टरच्या...

अनमोल हिरा

कोरोनाच्या साथीने आपल्यातून हिरावून नेलेला आणखी एक अनमोल हिरा म्हणजे ख्यातनाम बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी. सहजसुंदर अभिनयासाठी ते जितके ख्यातकीर्त होते, त्याहून अधिक ख्याती...

ऑनलाईन सहशालेय शिक्षण

देशासह राज्यात कोविड-१९ या आजाराचा शिरकाव होताच मार्च महिन्यात सर्वत्र लॉकडाऊन सुरू झाले. यामुळे शाळांना सुटी मिळाली व ती देखील अनिश्चित कालावधीसाठी वाटू लागली....

आयुर्वेदाचा विस्तार गरजेचा

गेल्या काही महिन्यांपासून आरोग्यविषयक चिंता वाढल्याने तसेच वाढत्या आव्हानांमुळे संबंधित तज्ज्ञ आणि संस्थांचे लक्ष पुन्हा एकदा पारंपरिक चिकित्सा प्रणालींच्या उपयुक्ततेकडे वळले आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे...

धानउत्‍पादक शेतक-यांना प्रतिक्‍विंटल ७०० रूपयांचा बोनस !

मुंबई,दि.२४ (प्रतिनिधी) धानउत्‍पादक शेतक-यांना दिलासा देण्यासाठी केंद्राच्या दराव्यतिरिक्‍त प्रतिक्‍विंटल ७०० रूपये बोनस देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे धानउत्‍पादक शेतक-याला २...

राज्‍यात पुन्हा लॉकडाउन करण्याबाबत कोणतीही चर्चा नाही – राजेश टोपे यांचे स्पष्टीकरण

मुंबई,दि.२४ (प्रतिनिधी) देशातील अन्य राज्‍यांच्या तुलनेत महाराष्‍ट्रातील परिस्‍थिती निश्चितच समाधानकारक आहे. त्‍यामुळे राज्‍यात लॉकडाऊन करण्याची सध्यातरी गरज नाही. तशी चर्चाही झालेली नाही. मात्र काही...

जयसिंगराव गायकवाड यांचा राष्‍ट्रवादीत प्रवेश

मुंबई,दि.२४ (प्रतिनिधी) स्व. प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांचे एकेकाळचे खंदे सहकारी व भाजपचे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपाला सोडचिठठी देऊन राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्ये...

आणखीन बातम्या

पदवीधरांच्या भाजपा मेळाव्यात कार्यकर्त्यांची गर्दी

लातूर : मराठवाडा पदवीधर मतदार संघ भाजपा व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ लातूर जिल्हा भाजपाच्या वतीने दि. २४ नोव्हेंबर रोजी...

धुमाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कासार सिरसी (नागेश पंडित ) : निलंगा तालुक्यातील नेलवाड येथील भारतीय सैन्य दलातील जवान अर्जुन (लखन) किसनराव धुमाळ (वय २४) हे कश्मीर खो-यात दोन...

शिरूर अनंतपाळ नगर पंचायत मधील भ्रष्टाचाराची चौकशी करावी. महाविकास आघाडी तर्फे महामोर्चा काढून कुलूप बंद आंदोलन

शिरूर अनंतपाळ :- नगर पंचायत मधील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी, यासाठी महाविकास आघाडी तर्फे दि. २४ नोव्हेंंबर मंगळवार रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस...

सेलू (खु.) येथे पंपावरील डिझेल चोरीचा प्रयत्न फसला

रेणापूर : रेणापूर-खरोळा या रस्त्यावर सेलू (खुर्द) येथे असलेल्या पेट्रोल पंपावर काही अज्ञात चोरट्यांनी रविवार दि २२ नोव्हेबर रोजीच्या मध्यरात्री पंपावरील डिझेल. चोरी होत...

लातूर जिल्ह्यात वीज बिलाची होळी

रेणापूर : भरमसाठ वीजबिलाबाबत नागरिकांना रास्त सवलत द्यावी या मागणीसाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपाचे रेणापूर तालुकाध्यक्ष अ‍ॅड दशरथ सरवदे...

८२ टक्के शाळांतून १२.५ टक्के विद्यार्थी उपस्थित

लातूर : राज्य सरकारच्या आदेशानूसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सुरक्षा उपायांची अंमलबजवणी करुन दि. २३ नोव्हेंबर लातूर जिल्ह्यातील शाळा सुरु झाल्या. आठ महिन्यांनंतर शाळेची घंटा...

रुमा बचत गटाच्या गोधडीची ‘अ‍ॅमेझॉन’वर भरारी

लातूर : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ‘उमेद’च्या माध्यमातून निलंगा तालुक्यातील अनसरवाडा येथील रुमा हा बचत गट पारंपरिक हस्तकारी गोधडी बनविण्याचा व्यवसाय करते....

सात दिवसानंतर निघणार सौदा

लातूर : लातूर आडत बाजार गेल्या सात दिवसापासून हमालांच्या हमाली दर वाढीवरून बंद आहे. रविवारी झालेल्या बैठकीत आडत बाजार सुरू ठेवून वाटाघाटी करून हमालीच्या...

‘रामकली’ रागाने दिवाळी पहाट बनली सुरेल

लातूर : यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे दिवाळी पहाट या सुरम्य अशा सुरेल अशा सांगीतिक मेजवानीला रसिक मुकणार की काय अशी भीती मनात होती. परंतु लातूर...

निलंग्यातील पोलिस कर्मचारी राजकुमार लोखंडे यांचे निधन

निलंगा : औसा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील तरुण पोलिस कर्मचारी आणि निलंगा येथील माळी गल्ली येथील रहिवासी राजकुमार शिवाजीराव लोखंडे (३३) यांचे शनिवार...
1,347FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...