लातूर : प्रतिनिधी
एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने वार्षीक स्रेहसंमेलनाचे औचित्य साधुन घेण्यात आलेल्या फनरन मॅरेथॉन स्पर्धेत हर्षद माकोडे याने प्रथम क्रमांक मिळवून विजेतेपद पटकावले. तर निखिल व्यवहारे, श्रीकांत काहूलकर यांनी अनुक्रमे व्दितीय व तृतीय क्रमांक मिळवला. एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय येथे अधिष्ठाता डॉ. एन. पी. जमादार यांनी हिरवा कंदील दाखवून मॅरेथॉनचा शुभारंभ केला. यावेळी उप अधिष्ठाता डॉ. बी. एस. नागोबा यांची प्रमुख उपस्थिती होती. एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणातून बुधवारी सकाळी ७ वाजता फनरन मॅरेथॉनला सुरुवात झाली. ंिरगरोड – रेल्वे स्थानक मार्गावरील वाय नॉट हॉटेल ते परत एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय असे पाच किमीचे अंतर हर्षद माकोडे यांने २९ मिनिटात पार करुन प्रथम क्रमांक पटकावला तर निखिल व्यवहारे यांने व्दितीय व श्रीकांत काहूलकर यांने तृतीय क्रमांक पटकावला.
अधिष्ठाता डॉ. एन. पी. जमादार व उप अधिष्ठाता डॉ. बी. एस. नागोबा यांनी या मॅरेथॉन मध्ये सहभागी होवून स्पर्धकांना प्रोत्साहन दिले. या मॅरेथॉन मधील विजेत्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांत व्यायाम आणि खेळा विषयी आवड वृंध्दीगत व्हावी यासाठी फनरन अर्थात मजेशिरपणे धावणे ही मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. या मॅरेथॉन स्पर्धेत एम. बी. बी. एस. अभ्यासक्रमाच्या ३०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.