22.1 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूरहलग-यात पुराच्या पाण्यात घोड्यासह महिलेचा मृत्यू

हलग-यात पुराच्या पाण्यात घोड्यासह महिलेचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

निलंगा : निलंगा तालुक्यात रविवार-सोमवारी जोरदार पाऊस झाल्याने नद्यासह परीसरातील गावातील ओढ्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे. हलगरा येथील एक महिला घोड्यासह ओढ्याच्या पाण्यात सोमवारी वाहुन गेली होती . मंगळवारी एन डी आर एफ व पोलिस पथकाने तिला शोधून काढले . यात ते दोघेही मृत अवस्थेत आढळून आले .

निलंगा तालुक्यात मध्यंतरी पावसाने दडी मारल्यानंतर पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे . रविवार सोमवारी दोन दिवस तालुक्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ढगफुटीसारखा पाऊस झाला. अचानक पडलेल्या ढगफुटीसारख्या पावसाने पूरस्थिती निर्माण झाली होती.. हलगरा येथील ओढ्याला सोमवारी सायंकाळी पूर आला होता. गावातील महिला सालिया मुजायतुला मौजन वय ४६ ही शेताकडून सांयकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पाऊस कमी झाला म्हणून गावाकडे निघाली होती शेजारील अर्जुन गोंिवंद रोडे यांनी शेतात बांधलेला घोडा गावाकडे घेऊन जा असा निरोप दिल्याने ती येताना सोबत घोडा घेऊन गावाकडे निघाली असता वाटेतील ओढ्याला पाणी वहात होते

सदर पाण्याचा अंदाज त्यांना आला नाही पाण्याचा वेगाने त्या वाहुन गेल्या सोबत असलेला घोडा ही वाहून गेला राञी अंधार झाल्याने दुस-या दिवशी सकाळी एनडीआरएफ पथक व औराद शहाजानी पोलीस ठाण्याची संयुक्त शोध मोहीम राबविण्यात आली. मंगळवारी दुपारी बाराच्या दरम्यान सदर महिलेचे प्रेत ओढ्यात कडेला चिखलात अडकलेले आढळून आले सदर महिलेचे शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकाकडे सुपुर्द केले असल्याची माहिती पोहेका
लतिफ सौदागर, पोलीस कॉन्स्टेबल विश्वनाथ डोंगरे यांनी सांगितली .

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या