23.2 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeलातूरग्रामीण भागातील महिलांनी लघु व्यवसायांकडे वळावे: चव्हाण

ग्रामीण भागातील महिलांनी लघु व्यवसायांकडे वळावे: चव्हाण

एकमत ऑनलाईन

शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गंत महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या माध्यमातून कर्ज वाटप करण्यात येत असून या कर्जातून ग्रामीण भागातील महिलांनी विविध व्यवसाय सुरू करून आपले जीवनमान उंचवावे, यांसह सुशिक्षित बेरोजगार मुलांना ऊऊवॠङ व फरएळक मार्फत प्रशिक्षणास पाठवून त्यांना त्यांच्या पायावर उभे होण्यास मदत करावी, असे आवाहन गटविकास अधिकारी बी.टी.चव्हाण यांनी केले.

या प्रसगी एबीडिओ यमुलवाड, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक सौरभ खैरे, तालुका अभियान व्यवस्थापक आर. एम. शिंदे, प्रभाग समन्वयक व्ही. सी. खलंगरे, चेअरमन प्रकाश पाटील, सरपंच नागनाथ हारगे, उपसरपंच हंसराज पाटील, ग्रामसेवक बालाजी मलवाड, बँकेचे शैलेश, बँक सखी मनीषा रेचवाड उपस्थित होते. दरम्यान तालुक्यातील बाकली येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या संयुक्त विद्यमाने कर्ज वाटप मेळावा घेवून २६ स्वयं सहाय्यता समूहांना ४४ लाख ५० हजाराचे कर्ज वाटप केले. यात बाकली ६ गट ११ लाख १० हजार, डोंगरगाव बोरी ९ गट १४ लाख ४० हजार, तळेगाव बोरी ४ गट ८ लाख, उजेड ५ गट ८ लाख, वांजरखेडा १ गट १ लाख, उमरदरा १ गट २ लाख वाटप करण्यात आले.

उमेद तालुका अभियान व्यवस्थापक एम. आर शिंदे यांनी महिलांना ऊकउ व समाजकल्याणच्या योजना ऑनलाईन अर्ज पद्धत, विविध शासकीय योजना मार्गदर्शन व वैयक्तिक परसबाग तयार करण्यासाठी आवाहन केले. प्रभाग समन्वयक वैभव खलंगरे यांनी गट व ग्रामसंघ याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमाकांत शिंदे यांनी केले.आभार ग्रामसेवक बालाजी मलवाड यांनी केले. यावेळी स्वंय सहाय्यता समुहांतील महिला, मुली व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या