32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeलातूरजिल्ह्यात ४७ विहिरींचे काम अर्धवट

जिल्ह्यात ४७ विहिरींचे काम अर्धवट

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर जिल्हा परिषदेच्या वतीने अनुसूचित जातीच्या शेतक-यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडर कृषि स्वावलंबन योजनेतंर्गत विहिरी मंजूर झाल्या होत्या. सदर मंजूर झालेल्या विहिरंना दोन वर्षात काम पूर्ण करण्याचा कालावधी आहे. त्या विहिरीपैकी अद्याप विहिरींचे काम सुरू न केलेल्या ६२ व अपूर्ण विहिरी असलेल्या ४७ विहिरींचा ३ कोटी ६२ लाख रूपयांचा निधी निधी मुदत संपल्याने लातूर जिल्हा परिषदेच्या कृषि विभागने शासनाला परत केला आहे.

लातूर जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाने अनुसूचित जातीच्या १९१ पात्र शेतक-यांना डॉ. बाबासाहेब आंबेडर कृषि स्वावलंबन योजनेतंर्गत २०१८-१९ मध्ये विहिरी मंजूर झाल्या होत्या. यासाठी शासनाने ७ कोटी १५ लाख रूपयांचा निधीही मंजूर केला होता. जिल्हयातील १९१ शेतक-यांपैकी १२९ शेतक-यांनी विहिरींचे काम सुरू केले होते. सदर कामासाठी शासनाने दोन वर्षाचा कालावधी दिला होता. मात्र शासनाने दिलेल्या मुदतीत ८२ विहिरी पूर्ण झाल्या आहेत. तर ४७ विहिरींचे खोदकाम अर्धवट झाले आहे. त्यावर ३ कोटी ५३ लाख रूपये खर्च झाले आहेत. तसेच ६२ शेतक-यांनी विहिरीचे खोदकामच सुरू केले नाही. कांही विहीरींचे खोदकाम झाले, पण बाधकाम झाले नाही, अशा अर्धवट विहिरींचा व विहिरींचे कामच न सुरू झालेल्या अशा विहिरींचा ३ कोटी ६२ लाख रूपयांचा अखर्चित निधी शासनाकडे लातूर जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाने जमा केला आहे.

तसेच लातूर जिल्हयातील अनुसूचित जमातीच्या शेतक-यांसाठी बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना राबविण्यात येते. या योजनेतंर्गत शेतक-यांना २०१८-१९ मध्ये १७ विहिरींना मंजूरी देण्यात आली होती. त्यासाठी शासनाने ६९ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला होता. १७ विहिरी पैकी १३ विहिरींचे काम सुरू झाले होते. त्यापैकी ११ विहिरींचे काम पूर्ण झाले. २ विहिरींचे खोदकाम होऊन त्या अर्धवट राहिल्या आहेत. या दोन्ही कामावर ३६ लाख रूपयांचा निधी खर्च झाला आहे. तर ४ विहिरींचे काम सुरूच झाले नाही. त्यामुळे अर्धवट विहिरींचा व काम सुरू न झालेल्या विहिरींचा ३३ लाख रूपयांचा निधी शासनकडे लातूर जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाने जमा केला आहे.

चालू वर्षात १४० विहिरींचे कामे सुरू
लातूर जिल्हा परिषदेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडर कृषि स्वावलंबन योजनेतंर्गत २०१९-२० मध्ये अनुसूचित जमातीच्या शेतक-यांसाठी २३७ विहिरी मंजूर झाल्या आहेत. त्यासाठी शासनाने ८ कोटी ५० लाख रूपये मंजूर केले आहेत. २३७ पैकी १४० विहिरींचे काम सध्या सुरू आहे. त्यावर ३ कोटी १० लाख रूपये खर्च झाले आहेत. तर ८३ विहिरींचे काम अद्याप सुरू झाले नाही. तसेच बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेतर्गत ३५ विहिरी मंजूर झाल्या असून त्यासाठी १ कोटी १७ लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. ३५ विहिरींपैकी २५ विहिरींचे काम सुरू झाले असून त्यावर ५७ लाख रूपये खर्च झाले आहेत. तर ८ विहिरी अद्याप सुरू झाल्या नसल्याचे लातूर जिल्हा परिषदेच्या कृषि विभागचे कृषि विकास अधिकारी सुभाष चोले यांनी सांगीतले.

उत्तर प्रदेशात आणखी एक एन्काउंटर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या