28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeलातूरजीवनात आनंद मिळेल असे काम करा

जीवनात आनंद मिळेल असे काम करा

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
जिवनभर जे काम करायचे आहे. त्यात आनंद नसेल तर असे काम पुढे नेणे खूप कठीण होते. त्यामुळे ज्या कामात तुम्हाला आनंद मिळेल अशा कामाची निवड करुन ते करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केले.
माईर्स एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयातील ‘एम.बी.बी.एस. स्पंदन २०१६’ या बॅचचा पदवी प्रदान सोहळया प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माईर्स एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत कराड हे होते. यावेळी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. ज्ञानेश्वर चिंते, डॉ. अशोक आरदवाड, डॉ. विठ्ठल लहाने, मेंदू शल्यचिकित्सक डॉ. हनुमंत किनिकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

एमबीबीएस नंतर काही जनांचे एमडी, एमएस करण्याचे ठरले असेल तर काही जनांना आपल्या वडिलांचे हॉस्पीटल पुढे चालवायचे असेल तर काही जन पुढे काय करायचे म्हणून गोंधळलेले असतील, असे सांगून जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. म्हणाले की, जीवनात सर्वच गोष्ठी ठरवून करता येत नाहीत. जीवन हे खुप गतीमान आहे. ते कुठे काय वळण घेणार हे माहित नसते. त्यासाठी आपण करीत असलेल्या कामात आनंद आणि समर्पणभाव असला पाहिजे. जर तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रात रस वाटत नसेल तर तुम्ही तुमच्या आवडीचे दुसरे क्षेत्र निवडू शकता. जे कोणते काम आपण करु त्याबद्द्ल वचनबध्दता, अखंडता आणि नैतिकता असावी तरच आपले काम समर्पण होईल.

डॉ. कराड म्हणाले की, निर्धार, समर्पन आणि प्रेम हे गुण एम.बी.बी.एस. सारखी कठीण पदवी मिळविण्यासाठी महत्त्वाचे ठरते. रुग्णसेवेतून अनेक गोष्टींचे शिक्षण मिळवून वैद्यकीय सेवेत पारंगत होता येते. प्रामाणिकपणे रुग्णसेवा दिल्यास त्यातून आनंद, प्रसिध्दी आणि अर्थप्राप्ती होते. वैद्यकीय शाखेत २५ टक्के शिक्षण हे शिक्षकांकडून, २५ टक्के स्वयं अध्ययनात, २५ टक्के रुग्णसेवेतून तर २५ टक्के ज्ञान येणा-या काळात मिळते. डॉक्टर हा वैद्यकीय शाखेचा तज्ज्ज्ञ म्हणून २० टक्के तर माणूस म्हणून ८० टक्के योगदान देत असतो.

डॉ. लहाने म्हणाले की, जो माणूस जीवनात कामाचा आनंद घेतो तो चांगला जगतो. वैद्यकीय शिक्षणात घातलेला वेळ हा रुग्णांचे दु:ख दूर करतो. तर डॉ. आरदवाड म्हणाले की, डॉक्टरचे आयुष्य खडतर आणि समाजसेवेचे आहे. त्याचा आनंद घ्यावा. डॉ. चिंते म्हणाले की, एम.बी.बी.एस. नंतर पुढे पीजी करुन डॉक्टरच व्हावे असे नाही तर इतर मार्ग निवडून यशस्वी होता येते. सध्या जगाला मानवी मुल्य देण्याचे काम भारत करीत असल्याचे ते म्हणाले.

यावेळी एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयातील ‘एम.बी.बी.एस. स्पंदन २०१६’ या बॅचच्या पदवीधरांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी डॉ. हनुमंत कराड यांनी पदवीप्रदान विद्यार्थ्यांना आरोग्य सेवेची शपथ दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजय काठोळे, डॉ. पराग टिपरे, डॉ. गायत्री सुर्वे, डॉ. श्रध्दा गरकल यांनी तर आभार डॉ. नम्रता गुर्ले यांनी मानले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या