25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeलातूरदयानंद शिक्षण संस्थेत जेंडर सेन्सीटायझेशनवर कार्यशाळा

दयानंद शिक्षण संस्थेत जेंडर सेन्सीटायझेशनवर कार्यशाळा

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
दयानंद शिक्षण संस्था, लातूर संचलित दयानंद विधी, विज्ञान, कला, वाणिज्य, फार्मसी महाविद्यालये तसेच दयानंद इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन, इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर, लातूर आणि भारतीय स्त्रीशक्ती, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने जेंडर सेन्सीटायझेशन या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

दयानंद सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी होते. या कार्यशाळेसाठी प्रमुख व्याख्याते आणि मार्गदर्शक म्हणून एम.डी. (आयुर्वेद), राष्ट्रीय संघटन, सचिव डॉ. मनीषा कोठेकर, संस्थेचे सचिव रमेश बियानी, सदस्य हरीकिशन मालू, अ‍ॅड. माधव इंगळे, भारतीय स्त्री शक्तीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष कुमुदिनी भार्गव, राष्ट्रीय कोषाध्यक्ष सीमा देशपांडे, भारतीय स्त्रीशक्ती लातूरच्या अध्यक्ष डॉ. जयंती आंबेगावकर, सचिव प्रेमा बाहेती, दयानंद शिक्षण संस्थेअंतर्गत येणा-या सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. कोठेकर म्हणाले, कोणत्याही व्यक्तीच्या सामान्य विकासासाठी जेंडर सेन्सीटायझेशन ही एक मूलभूत गरज आहे. जेंडर सेन्सीटायझेशन ही संकल्पना भेदभाव आणि जेंडर बायस यामधील निर्माण होणारे अडथळे कमी करण्याचा एक मार्ग आहे. योग्य प्रकारे जेंडर सेन्सीटायझेशन झाले तर त्याचे जेंडर काहीही असले तरी परस्पर आदर निर्माण होतो असे त्यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले. त्यासाठी जेंडर, सेक्स, जेंडर बायस ई. संज्ञा त्यांनी सखोलपणे समजावून सांगितल्या. कार्यशाळेचे प्रस्ताविक प्राचार्य डॉ. पुनम नाथानी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. कोमल गोमारे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. रूपा गिल्डा यांनी केले. या एक दिवसीय कार्यशाळेला दयानंद शिक्षण संस्थेअंतर्गत सर्व महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थित होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या