16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeलातूरजागतिक हात धुवा दिवस साजरा करण्­यात येणार

जागतिक हात धुवा दिवस साजरा करण्­यात येणार

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
१५ ऑक्टोबर रोजी जागतिक हात धुवा दिनाच्या निमित्ताने जिल्­हयातील सर्व शाळा, अंगणवाडी व ग्राम पंचायतीमधून शनिवारी जागतिक हात धुवा दिवस साजरा करण्­यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली. स्­वच्­छ भारत मिशन (ग्रामीण) अभियानांतर्गत राबविण्­यात येणा-या स्­वच्­छतेच्­या विविध कार्यक्रमांपैकी वैयक्तिक स्­वच्­छतेसाठी हात धुणे हा एक महत्­वाचा भाग आहे. जनतेच्­या स्­वच्­छतेविषयी जाणीवा समृध्­द होवून सदृढ, निरोगी व आनंददायी जिवनासाठी जागतिकस्­तरावर शनिवार दि. १५ ऑक्­टोबर हा दिवस दरवर्षी हातधुवा दिन म्­हणून साजरा केला जातो. त्­याअनुषंगाने जिल्­हयातील सर्व ग्राम पंचायतीमधून जागतिक हातधुवा दिन साजरा करण्­यात येणार आहे.

हातधुवा दिनाच्­या संकल्­पनेला धरुन अन्­न स्­वच्­छता, हातधुण्­याच्­या महत्­वाच्­या वेळा विशेषत: स्­वयंपाक करण्­यापूर्वी, स्­वयंपाक झाल्­यावर, शौचाहून आल्­यावर, जेवणापूर्वी, बाळाला भरविण्­यापूर्वी, लहान बाळाची शी धुतल्­यानंतर, झाडझुड केल्­यानंतर, पाळीव प्राणीमात्रांना स्­पर्श केल्­यानंतर, आजारी व्­यक्­तीच्­या भेटी पूर्वी व नंतर, बाहेर खेळून, फिरुन आल्­यानंतर साबणाने हात धुणे आवश्­यक आहे. या संदर्भात ग्रामीण भागातील लोकशिक्षण घडवून आणण्­यासाठी गावातील सर्व सार्वजनिक ठिकाणी हात धुण्­याचे प्रात्­यक्षिक करुन दाखविण्­यात येणार आहे.

यासाठी मोठया प्रमाणात जनजागृती शाळा अंगणवाडी सह ग्रामपंचायतीनी करावी तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना हात स्वच्छ धुण्याचे महत्त्व सांगताना हात धुण्याचे चे प्रात्यक्षिक करून दाखवणे आवश्यक असून हात धुण्याचे फायदे तोटे सांगितल्यास वर्तन बदलास मदत होणार आहे.यासाठी शालेय विद्यार्थ्यांसोबत हात धुण्याचे महत्त्व व त्यांचा आरोग्यास होणारा लाभ याबाबत चर्चा व संवाद साधण्यात यावा. शालेय स्तरावर या दिवसानिमित्त ‘हाताची स्वच्छता’ या विषयावर निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, व पोस्टर तयार करणे आशा विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात याव्या.असेही आवाहन करणत आले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या