तोंडार : विलास सहकारी साखर कारखाना लि.युनिट-२, तोंडार, ता.उदगीर, जि.लातूर कारखान्याचा गळीत हंगाम २०२२-२३ करिता गुरूवारी दि. ४ ऑगस्ट रोजी मिल रोलरचे पूजन कारखान्याचे व्हाईस चेअरमन रवींद्र काळे यांच्या हस्ते कारखान्याचे संचालक, निमंत्रित संचालक व कार्यकारी संचालक ए.आर.पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे. पुढील गाळप हंगामासाठी आवश्यक ती यांत्रिक व पुरक कामे पुर्णत्वास येत असून येणा-या गळीत हंगामात अधिकाधिक क्षमतेने ऊसाचे गाळप करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी लागणारी ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेसोबत करार करण्यात आले असून सदरील यंत्रणेस अॅडव्हान्सचे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती कारखान्याचे व्हाईसचेअरमन रवींद्र काळे यांनी दिली आहे.
लोकनेते विलासराव देशमुख यांची प्रेरणा, माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांचे सुक्ष््म नियोजनाखाली कारखान्याचे संस्थापक, राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा माजी पालकमंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख, चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख, आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्त्वाखाली विलास युनिट-२ साखर कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरु आहे.
विलास युनिट-२ रोलर पूजन कार्यक्रमास कार्यकारी संचालक ए.आर.पवार, संचालक सर्वश्री अनंत बारबोले, गुरूनाथ गवळी, अनिल पाटील, निमंत्रित संचालक रामराव बिरादार, सिध्देश्वर पाटील, ज्ञानोबा गोडभरले, पंडीत ढगे, विजय निटुरे, विनोबा पाटील, राजेंद्र पाटील, मन्मथ किडे, मारोती पांडे व विनोद सुडे यांच्यासह युनीट-२ चे अधिकारी, कर्मचारी व कामगार उपस्थित होते.