24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeलातूरनीळकंठेश्वर ग्रामदैवतचा यात्रा महोत्सवास प्रारंभ

नीळकंठेश्वर ग्रामदैवतचा यात्रा महोत्सवास प्रारंभ

एकमत ऑनलाईन

किल्लारी : महेश उस्तुरे
किल्लारी व परिसरासह लातूर, उस्मानाबाद व बाजूच्या कर्नाटक आंध्रप्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आसलेल्या ग्रामदैवत निळकंठेश्वर यात्रा महोत्सवास आज दि १२ ऑगष्टपासून सुरू होत असून ंहा महोत्सव २२ पर्यत ११ दिवस सुरू राहाणार आहे . या निमित्ताने देवस्थान कमेटीच्या वतीने जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आहे.
दर्शन मांडप, दर्शन रांगा, स्वंसेवक गार्ड, खेळणी स्टाल, हॉटेल, बेलफुले स्टाल, बच्चे कंपनीसाठी पाळणे, ब्रेक डान्स, मौतकुवा, पोलीस बंदोबस्त, पाणी, लाईट, वहान पार्कींग, भोजन व्यवस्था, मोफत वाहन स्थळ, गाड्या पार्किंगची व्यवस्था करण्यात येत आहे. यात्रेच्या निमित्ताने विविध सामाजीक उपक्रम राबविण्यात येत आहेत. यात रक्तदान शिबीर, नेत्र चिकित्सा व शस्त्रकिया शिबीर, प्राचीन काळपासूनचे आतापर्यंतचे दुर्मीळ टेलीफोन प्रदर्शन, डॉ स्वागत तोडकर याचे व्याख्यान व शिबीर आयोजित करण्यात आले आहे. मंदीर कळस व परीसरात विद्युत रोषनाई करण्यात आली आहे

या यात्रेचे आकर्षण अभिनेत्री इशा आग्रवाल, बालाजी सुळ, हभप निवृत्ती इंदुरीकर महाराज हे राहणार असून आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते महाआरती करुन यात्रा महोत्सवास प्रारंभ करण्यात आला. यात्रा होईपर्यंत दररोज विविध मान्यवरांच्या हस्ते पूजा होणार आहे. यात आमदार धिरज विलासराव देशमुख, आमदार रमेश कराड, माजी राज्यमंत्री बस्वराज पाटील, खासदार ओमराजे ंिनंबाळकर, पोलिस अधीक्षक निखील ंिपगळे, पोलिस उपविभागिय आधिकारी गणेश किंद्रे, श्रीशैल्य उटगे, सा क धर्मादाय आयुक्त लातूर, डॉ अनीता जमादार पोलिस अधीक्षक महामार्ग यांचा समावेश आहे. दैनंदिन कार्यक्रमात धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सपोनी सुनील गायकवाड यानी यात्रात आनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त बाहेरुन मागविल्याचे सांगीतले. तसेच विविध दैनंदिन धार्मिक कार्यक्रम होणारी आहेत.

दि. २२ रोजी संभाजी झरे यांचे ८ ते १२ भारुड स्पर्धा होणार असून १२ नंतर महाआरती मंदिर ते किल्लारी ५ किलोमीटर पालखी मिरवणूक होऊन यात्रेची सांगता होणार आहे किलारी पाटी ते मंदीरापर्यत जाण्यासाठी मोफत सेवेचे नियोजन सूर्यकांत बाळापूरे, जनार्दन डुमने, बालाजी चव्हाण हे नियोजन करणार आहेत, अशी माहिती देवस्थान ट्रस्टीचे अध्यक्ष अशोक गावकरे, उपाध्यक्ष प्रकाश पाटीले, चंद्रकांत बाबळसुरे, मनोहार गवारे, सुभाष लोहार, नामदेव माळवदे, निळकंठ बिराजदार यांनी माहिती दिली. यात्रा यशस्वी पार पाडण्यासाठी राजेन्द्र जळकोटे, बिसरसींग ठाकूर, देवीदास मिरकले, आंकुश भोसले, प्रशांत गावकरे, भारत बोळशेट्टे, मडोळे गुरुजी, पप्पू भोसले, जितू शिंंदे राजू बिराजदार, खंडू बिराजदार आदी परिश्रम घेत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या