22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeलातूरकिल्लारी साखर कारखाना आपणच सुरू करणार

किल्लारी साखर कारखाना आपणच सुरू करणार

एकमत ऑनलाईन

औसा : औसा तालुक्यातील बंद असलेल्या दोन सहकारी साखर कारखाने सुरूकरावे यासाठी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. यामध्ये बेलकुंडच्या साखर कारखान्याला थकहमी मिळाली असून किल्लारी साखर कारखाना आपणच सुरू करणार असल्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले आहे.

दि.२७ ऑक्टोबर रोजी किल्लारी (ता.औसा) येथील ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित शेतकरी संवाद प्रसंगी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, औसा तालुक्यातील महत्त्वाचे दोन साखर कारखाने सुरू होणे आवश्यक असून यापैकी किल्लारी सहकारी साखर कारखाना मीच सुरू करणार आहे.असे सांगून अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले असून शेतक-यांना देण्यात आलेली मदत ही तुटपुंजी आहे. यासाठी आम्ही वाढीव मदतीसाठी सरकार विरोधात संघर्ष करणार आहोत. किल्लारीच्या विकासासाठी मनरेगाच्या माध्यमातून आपल्या गावचा विकास साधून घ्या. गावाच्या विकासासाठी गावचे राजकारण बाजूला ठेवा, विकासावर बोला मनरेगातून गावाचा संपूर्ण विकास करणे सहज शक्य असून सध्या कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर सरकारकडे पैसा नसून केंद्र सरकारच्या मनरेगा योजनेसाठी भरीव निधीची तरतूद असताना याचा पुरेपूर फायदा घेत गावाचा विकास करून घ्यावा असे आवाहन त्यांनी उपस्थित लोकांना केले.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष काकासाहेब मोरे, संतोष मुक्ता,सरपंच शैलाताई लोहार, उपसरपंच युवराज गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पाटील, माजी पंचायत समिती सदस्य जयपाल भोसले, माजी सरपंच डॉ. शंकर पडसळगे, गोंिवद भोसले, सुलक्षणा बाबळसुरे, दिलीप लोहार, नेताजी कांबळे, वलिखा पठाण,अरुण अलाट, दिलीप लोहार, रावसाहेब भोसले, दिपक पाटील, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी आदींसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

काळ सोकावता कामा नये!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या