शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील हिप्पळगाव येथील गणेश दयानंद कोकरे वय २५ वर्ष यांचा दि. २७ जून रोजी पहाटे ५ .१५ च्या दरम्यान राहत्या घरी मोबाईल चार्जिंगला लावत असताना शॉक लागल्याने तरुणाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली असून या संदर्भात शिरूर अनंतपाळ पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद झाली आहे.
या बाबत शिरूर अनंतपाळ पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की हिप्पळगाव येथील गणेश दयानंद कोकरे वय २५ वर्ष हा घरात मोबाईल चार्जिंगला लावत असताना वीजेचा जबरदस्त शॉक लागून जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली. या दुर्दैवी घटनेत तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
एक वर्षापुर्वी लग्न झालेला हा युवक आई वडीलाला एकूलता एक मुलगा होता.त्याचा पश्चात पत्नी व आईवडील आहेत.मच्छिंद्र सदाशिव कोकरे रा.हिप्पळगाव यांच्या खबरी वरुन शिरुर अनंतपाळ पोलिसात एडी नं .१५ / २० प्रमाणे कलम १७४ सी आरपीसी नुसार अकस्मात मृत्युची नोंद शिरूर अनंतपाळ पोलिसात झाली असून पुढील तपास पोहे का हरिराम सोनकांबळे हे करीत आहे.
Read More हेकेखोर चीनला टक्कर देण्यासाठी लडाखमध्ये ‘आकाश’ क्षेपणास्त्र तैनात