22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeलातूरआपल्या उज्जवल भविष्यासाठी युवकांनो डोक्याचा वापर करा

आपल्या उज्जवल भविष्यासाठी युवकांनो डोक्याचा वापर करा

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
आपल्या धडावर आपले डोके आहे. सर सलामत तो पगडी पचास. आपला मेंदु जो विचार करतो. त्यातील भास-अभास समजून घ्या. देव, धर्म, कर्मकांड करतांना त्यातील श्रध्दा आणि अंधश्रध्दा समजून घ्या. विज्ञानांचे नियम धरुन विचार करा. विवेकाला चालना द्या. संत गाडगे बाबा शाळेत गेले नाहीत पण त्यांनी आपल्या बुध्दीचा व डोक्याचा वापर कसा करावा हे समाजाला शिकविले. त्यांच्या नावाचे संत गाडगेबाबा विद्यापीठ आहे. शिक्षणामुळे आपले विचार व दृष्टी बदलली पाहिजे म्हणुन आपल्या उज्जवल भविष्यासाठी डोक्याचा वापर करा, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे प्रधान माधव बावगे यांनी केले.

येथील श्रीमती सुशीलादेवी देशमुख वरिष्ठ महाविद्यालयात संत गाडगेबाबा स्वच्छता उत्सव समारंभात – अंधश्रध्दा निर्मुलन या विषयावर माधव बावगे बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अजय पाटील होते. विचार मंचावर प्राचार्य डॉ. संजय वाघमारे, ग्रंथपाल डॉ. पालकर आर. डी., डॉ. बाळु कांबळे, विद्यार्थी प्रतिनिधी योगेश देशपांडे यांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना माधव बावगे म्हणाले की, भूत, बाधा, पिशाच्च, अद्भूत शक्ती या आहेत की नाही याचा शोध घेतला तरच अंधश्रध्दा दूर होतील. शिक्षणातून आपले विचार व मानसिकता बदलण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन असला पाहिजे. शिकुनही कुंडली जुळत नाही म्हणुन लग्न होत नाही ही अंधश्रध्दा नाही का ? संशयाचे भूत मानगुटीवर बसू देवू नका. नजर लागणे, बाहेरील होणे, विटाळणे, भानामती होणे, अंगावर बिबे उमटणे, आपोआप कपड्यांना आग लागणे आदी अनेक संदर्भातील अंधध्दा कशा आहेत ते प्रयोगाने सिध्द करुन युवकांनी आपल्या डोक्याचा वापर का व कशासाठी करावा. यासाठी सविस्तर मार्गदर्शन केले.

प्रारंभी प्रास्ताविकपर विचार प्रा. बापु गायकवाड यांनी मांडले. याबरोबरच प्राचार्य डॉ. संजय वाघमारे यांनी प्राचीन भारत हा संपूर्ण विश्वाला ज्ञान देणारा सर्व क्षेत्रात प्रगत असलेला देश होता. आपल्या देशात विदेशातील लोक येऊन शिकत होते. हे आपणांस विसरता येत नाही. आपले पूर्व वैभव पुन्हा निर्माण करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टी ठेवून युवकांनी शिक्षण घ्यावे व स्वत:मध्ये बदल घडवावा. परिवर्तन करावे या विषयी मौलिक माहिती दिली. अध्यक्षीय समारोपाचे यथोचित असे भाषण प्राचार्य डॉ. अजय पाटील यांनी केले. स्वच्छता उत्सवाविषयी महाविद्यालयाची भूमिका व युवकांचा उत्स्फुर्त सहभाग याबद्दल आपली भूमिका सांगीतली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. दादासाहेब लोंढे यांनी केले तर आभार बी. ए. कांबळे यांनी मानले. या समारंभास शिक्षकवृंद व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या