26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeलातूरशिवणी (खु.) सोसायटीच्या चेअरमनपदी युवराज जाधव यांची चौथ्यांदा बिनविरोध निवड

शिवणी (खु.) सोसायटीच्या चेअरमनपदी युवराज जाधव यांची चौथ्यांदा बिनविरोध निवड

एकमत ऑनलाईन

लातूर : तालुक्यातील शिवणी (खु.) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची नुकतीच बिनवीरोध निवडणुक झाली. या संस्थेच्या चेअरमनपदी विलास सहकारी साखर कारखानाचे संचालक युवराज जाधव चौथ्यांदा बिनवीरोध निवड झाली असून व्हाईस चेअरमनपदी बळीराम मद्दे यांची बिनविरोध निवड झाली.

या निवडी बद्दल माजी मंत्री दिलीपराव देशमुख, राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख व लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी अभिनंदन करुन पूढीलवाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. शिवणी (खु.) विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाली. या नंतर बुधवार, दि. १ जून रोजी निवडणूक निर्णय अधिकारी जीवन जाधव यांच्या अध्यतेखाली सोसायटीच्या नवनियुक्त संचालक मंडळाची चेअरमन व व्हाईस चेअरमन व अन्य पदाधिकारी निवडीसाठी बैठक झाली.

त्यात सलग चौथ्यादा विलास कारखानाचे संचालक युवराज जाधव यांची चेअरमनपदी तर व्हा.चेअरमनपदी बळीराम मद्दे यांची निवड झाली. संचालक म्हणून कृष्णा गिरी, व्यंकट औटे, इमाम बेग, गिरीधर मोरे, यशवंत शिंदे, मधुकर जाधव, चंद्रकांत मोमले, मधुकर हुगे, कोमल तत्तापूरे, रसिका जाधव, बिटूबाई गायकवाड यांची बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी जीवन जाधव यांनी जाहीर केले. यावेळी सोसायटीचे सचिव सतीष पांचाळ हे उपस्थित होते. पदाधिकारी निवडीनंतर नूतन पदाधिर्का­यांचा शाल, पुष्पहाराने सत्कार करुन, पेढे भरवून आनंद व्यक्त करण्यात आला.

या प्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक निवृत्ती गुणाले, माधवराव लातूरे, तुकाराम बरुरे, राहूल औटे, भानुदास कोतमे, बळवंत जाधव, महमंद शेख, ज्ञानोबा जाधव, बालासाहेब देशपांडे, ज्ञानोबा मद्दे, गोंिवद जाधव, भालचंद्र जाधव, देविदास जाधव, ज्ञानेश्­वर जाधव, शिवराज जाधव, अब्बास शेख, प्रल्हाद जाधव, व्यंकट चामे, बसंिलग औटे, नामदेव गुणाले, रमाकांत औटे, उमाकांत तत्तापूरे आदी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या