23.2 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeलातूरतगरखेडचा सुपुत्र ठरतोय झी युवाचा सुपर स्टार

तगरखेडचा सुपुत्र ठरतोय झी युवाचा सुपर स्टार

एकमत ऑनलाईन

निलंगा : मराठवाडयाचा एक वेगळा इतिहास आणि एक वेगळी ओळख नेहमीच या मातीत वेगवेगळया कला गुणांनी बहरलेले रत्ने जन्माला येतात. असेच एक रत्न दि. १२ सप्टेंबर रोजी झी युवा या मराठी टी. व्ही. चॅनलवर दुपारी १२ आणि रात्री ७ वाजता आम्ही बेफिकर या फिल्ममध्ये मुख्य भूमीकेच्या रूपात पहायला मिळणार आहे.

मराठवाडयातील लातूरचे सिनेअभिनेते रितेश विलासराव देशमुख यांनी चित्रपट सृष्टीत आपली एक छाप तयार केली आहे. त्यानंतर मराठवडयातील अनेक तरूण या चित्रपट सृष्टीकडे वळत आहेत. यात तगरखेडा ता. निलंगा, जिल्हा लातूर येथील राहूल गुणवंत पाटील या युकाने गेली सहा वर्षे फिल्म इंडस्ट्रीमध्ये मेहनत घेऊन आज मराठवाड्याचे व तगरखेडा गावचे नाव उज्वल केले आहे. आतापर्यंत त्यांनी दहा फिल्म आणि एक म्युझिक अल्बम आणि पंचवीस एक शॉर्ट फिल्म केल्या आहेत.

यापूर्वी त्यांनी सुप्रसिद्ध गायक सोनू निगम, आनंद शिंदे यांच्या म्युझिक मध्ये ही मुख्य भूमीका केलेल्या आहेत. नुकतेच त्यांचे दोन मराठी अल्बम रिलिज झालेले आहेत. तसेच ते सुपर हिट ठरले आहेत. आपण सर्व प्रेक्षकांनी अशा कर्तृत्वान युवा अभिनेत्याला प्रोत्साहन देण्यासाठी झी युवा या मराठी चॅनल वरती दि. १२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता आणि रात्री ७ वाजता त्यांचा आम्ही बेफिकर हा सिनेमा पहावा, असे तगरखेडा येथील ग्रामस्थांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या