31.9 C
Latur
Monday, January 25, 2021
Home लातूर लातूर जिल्ह्यातील २४ कोविड सेंटरमध्ये रुग्णसंख्या शून्य

लातूर जिल्ह्यातील २४ कोविड सेंटरमध्ये रुग्णसंख्या शून्य

एकमत ऑनलाईन

लातूर : तब्बल एक वर्षानंतर लातूर जिल्ह्यात कोरोनाच्या बाबतीत दिलासा मिळताना दिसत आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. जिल्ह्यातील ३७ कोविड केअर सेंटरपैकी २४ सेंटरमध्ये रुग्णसंख्या शुन्य आहे. सध्या डीसीएच मधील अ‍ॅक्ठीव्ह रुग्ण ८६, कोविड केअर सेंटरमधील अ‍ॅक्टीव्ह रुग्ण २०, डीसीएचसीमधील अ‍ॅक्टीव्ह रुग्ण ३२, होम आयसोलेशनमधील अ‍ॅक्टीव्ह रुग्ण १३० तर एकुण उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या २६८ एवढी आहे.

जिल्ह्यातील उदयगिरी लायन्स हॉस्पिटल उदगीर, जयहिंद सैनिक शाळा कोविड केअर सेंंटर उदगीर, जयहिंद सैनिक शाळा कोविड केअर सेंटर उदगीर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध निवासी शाळा कोविड केअर सेंटर तोंडार पाटी उदगीर, मुलांची शासकीय निवासी शाळा मरशिवनी तालुका अहमदपूर, मुलांची शासकीय निवासी शाळा औसा, उप जिल्हा रुग्णालय निलंगा, कोविड केअर सेंटर दापका तालुका निलंगा, कोविड केअर सेंटर जाऊ तालुका निलंगा, शासकीय वसतीगृह न्यु. बिल्डींग देवणी, कृषी पी. जी. कॉलेज चाकुर, कोविड केअर सेंटर बावची तालुका रेणापूर, सामाजिक न्याय भवन लामजना, एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय लातूर, बिडवे अभियांत्रिकी मुलींचे वसतीगृह लातूर, पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय लातूर, संभाजी केंद्रे महाविद्यालय जळकोट, शिवनेरी कॉलेज मुलींचे वसतीगृह शिरुर अनंतपाळ, लातूर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल लातूर, आयकॉन हॉस्पिटल लातूर, गायत्री हॉस्पिटल लातूर, मध्यवर्ती जिल्हा कारागृह लातूर, मोरे हॉस्पिटल मुरुड, व्हीजन हॉस्पिटल लातूर व चवंडा हॉस्पिटल लातूर या २२ कोविड केअर सेंटरमध्ये सद्या रुग्णसंख्या शुन्य आहे. घटती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रशासनाने ११ कोविड केअर सेंटर बंद केले आहेत. शिवाय या केंद्रांवरील कर्मचा-यांच्या नियुक्त्याही तात्पूरत्या स्वरुपात रद्द केल्या आहेत. उपचार घेऊन बरे होणा-यांची संख्या अधिक असून दाखल होणा-या रुग्णांची संख्या कमीकमी होत चालली आहे. सध्या आयसीयुमध्ये २५, गंभीर मेकॅनिक व व्हेंटीलेटरवर शुन्य, गंभीर बीपार व्हेंटीलेटवर ९, मध्यम ऑक्सिजनवर ४२, मध्यम परंतु, ऑक्सिजन नसलेले ६७ तर सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या १५० एवढी आहे.

बरे होण्याचे प्रमाण वाढले ४लातूर जिल्ह्यात एप्रिल २०२० पासून कोरोना विषाणुचा संसर्ग सुरु झाला. एप्रिलमध्ये जिल्ह्यात केवळ १६ कोरोनाबाधित रुग्ण होते. मे महिन्यात ११९, जूनमध्ये २१४, जुलैमध्ये १८५१, ऑगस्टमध्ये ५९११, सप्टेंबरमध्ये ९१८८, ऑक्टोबरमध्ये ३०२२ तर नोव्हेेंबरमध्ये आतापर्यंत ७७२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत लातूर जिल्ह्यात २१ हजार ९३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले तर उपचार घेऊन बरे झालेल्यांची रुग्णसंख्या २० हजार १९० एवढी आहे. बरे होण्याचे प्रमाण ९५.७१ एवढे आहे.

नांदेड तालुक्यात दिग्गजांना धक्का

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,417FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या