24.8 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूरजिल्हा बँक प्रशस्त इमारतीत अत्याधुनिक सेवा देणार

जिल्हा बँक प्रशस्त इमारतीत अत्याधुनिक सेवा देणार

एकमत ऑनलाईन

औसा : तालुक्यातील मातोळा येथील जिल्हा बँकेच्या नूतन प्रशस्त इमारतीतून ग्राहकांना अत्याधुनिक सेवा देण्यात येणार असल्याचे बँकेचे माजी चेअरमन तथा संचालक अ‍ॅड. श्रीपतराव काकडे यांनी सांगितले. औसा तालुक्यातील मातोळा येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीने जिल्हा बँकेच्या नूतन प्रशस्त इमारतीचे पूजन सोमवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन व्यंकटराव भोसले हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, संचालक पृथ्वीराज शिरसाठ, संचालक राजकुमार पाटील, संचालक अनुप शेळके, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक हणमंत जाधव, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव बाजुळगे, उपाध्यक्ष शामराव भोसले, औसा बाजार समितीचे सभापती राजेंद्र भोसले, मारुती महाराज साखर कारखान्याचे संचालक सचिन पाटील हे उपस्थित होते.

यावेळी बँकेचे उपाध्यक्ष अ‍ॅड प्रमोद जाधव यांनी नूतन इमारत बांधण्यासाठी बँक आपल्या स्तरावर पूर्ण सहकार्य करेल, असे सांगीतले कार्यक्रमास मातोळा येथील सरपंच बालाजी सूर्यवंशी, सोसायटीचे माजी चेअरमन मधुकर भोसले, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील, सोसायटीचे व्हॉईस चेअरमन गणेश भोसले, माणिकराव मोरे, धनंजय भोसले, बाबासाहेब दारफळकर, प्रदीप भोसले, रामचंद्र भोसले, भुरे, शिवाजी भोसले, किसन गोरे, बबन आनंदगावकर, नंदकुमार भोसले, रवी भोसले, विक्रम भोसले, गजेंद्र माळी, मुकुंद भोसले, नेताजी भोसले, दत्तू सूर्यवंशी, विक्रम भोसले, राम गायकवाड, बँकेचे माध्यम समन्वयक हरिराम कुलकर्णी, इंजिनियर अनंत गाडे, मातोळा जिल्हा बँकेचे शाखा व्यवस्थापक पीचे, जनार्दन साळवे, इन्स्पेक्टर, गटसचिव मदने, हिप्परगा सोसायटीचे चेअरमन व्यंकटराव पाटील, लोहटा चेअरमन ंिलंबराज चव्हाण कवळी चेअरमन नीळकंठ जगताप, ग्रामस्थ, सभासद उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रशांत भोसले यांनी मांडले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या