22.6 C
Latur
Monday, January 18, 2021
Home लातूर जिल्हा परिषद सीईओची विविध ठिकाणी भेट

जिल्हा परिषद सीईओची विविध ठिकाणी भेट

एकमत ऑनलाईन

शिरूर अनंतपाळ : लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी तालुक्यातील कोव्हिड केअर सेंटरसह प्राथमिक आरोग्य केंद्रासह विविध ठिकाणी भेट कामांची पाहणी केली व अधिकारी कर्मचा-यांना योग्य त्या सूचना केल्या.

शहरातील कोव्हीड केअर सेंटरमधील सुविधा, तेथील व्यवस्थेची पाहणी करून उपयुक्त सूचना दिल्या त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी केली.तसेच ग्रामीण रुग्णालय इमारतीची पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घेतली. अद्याप प्राथमिक आरोग्य केंद्र व अधिनस्ति उपकेंद्रांना ग्रामपंचायत मार्फत साहित्य दिले नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून पुढील दोन दिवसांत सर्व ग्रामपंयातींनी आपला वाटा देऊन साहित्य उपलब्ध करून द्यावे, अन्यथा संबंधितांना सोडणार नाही अशी तंबी दिली.

पंचायत समितीला भेट देऊन जल जीवन मिशन अंतर्गत नळधारकांच्या आॅनलाईन नोंदीविषयी विचारणा केली व सर्व नोंदी पुढील चार दिवसांत पूर्ण करण्याविषयी सांगताना प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र ,अंगणवाडी इमारतीच्या सद्यस्थितीचे सर्व्हेक्षण करून अहवाल पंधरा दिवसांत सादर करण्याविषयी संबंधितांना सूचना दिल्या. पंचायत समिती परिसरातील मियावाकी व रुफ टॉप हार्वेस्टींगची पाहणी करून समाधान व्यक्त केले.

त्यानंतर हालकी ग्रामपंचायत येथे भेट देऊन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व उपकेंद्राला ग्रा.पं.ने दिलेल्या साहित्य, नवीन ग्रा. पं. इमारत, वृक्ष लागवडीच पाहणी व वृक्षारोपण करून ग्रामपंचायतीला उपयुक्त सूचना केल्या.यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. परगे, तहसीलदार अतुल जटाळे, गटविकास अधिकारी नंदकिशोर शेरखाने, पोलिस निरिक्षक परमेश्वर कदम, नगरपंचायत सीओ सचीन भुजबळ, एबीडिओ मुंढे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आर.एच.पवार,बीइओ अनिल पागे, विस्तार अधिकारी बालाजी पोतदार यांसह आधिकारी, कर्मचारी उपस्थित होते

Read More  छत्रपती शिवरायांच्या कळंबच्या महारांगोळीची विश्वविक्रमात नोंद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या