22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeलातूरजिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा बनली जुगाराचा अड्डा

जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा बनली जुगाराचा अड्डा

एकमत ऑनलाईन

माळहिप्परगा : जळकोट तालुक्यातील माळहिप्परगा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुगार खेळण्यासाठी अरामदाई जागा बनली आहे. या ठिकाणी गावातील तरुण येऊन पत्ते खेळत असून व खेळलेल्या पैशातून दारूआणून त्याच ठिकाणी दारू पीत आहेत. खुल्या बाटली व पाणी पाऊचचा या ठिकाणी खच भरला आहे. पत्ते खेळत असताना सुपारी,गुटका खाऊन वरांड्यांवर थुंकत आहेत, काही लहान मुले तर खुल्या दारूच्या बाटल्या मैदानावर, व्हरांड्यांवर फोडत आहेत.

या ठिकाणी फुटलेल्या बाटल्यांच्या काचा लहान मुलांच्या पायात घुसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील काही दिवसात शाळेचे रंग रंगोटीचे काम केले आहे परंतु लॉकडाऊनच्या काळात लोकांना बसण्यासाठी जिल्हा परिषद शाळेची इमारत पत्ते खेळण्यासाठी व दारू पिण्यासाठी सोईची जागा बनली आहे. प्रशासन याकडे लक्ष देईल का असा प्रश्न नागरिकांना प्रश्न पडला आहे.

ड्रॅगन विरोधात एकजूट

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या