21.3 C
Latur
Tuesday, September 17, 2024
Homeमहाराष्ट्रसांगली कारागृहात दारु, गांजा हस्तगत

सांगली कारागृहात दारु, गांजा हस्तगत

सांगली : येथील कारागृह आवारातील टॉवर क्रमांक २ च्या खाली गवतामध्ये दारु, गांजा आणि दोन मोबाईल असा ८४० रुपयांचा ऐवज आढळून आला. कारागृहातील कैद्याना देण्याच्या उद्देशाने कोणीतरी तेथे ठेवले असल्याचा पोलिसांचा कयास आहे.

ही घटना रविवार दि. ५ रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत वरिष्ठ तुरुंग अधिकारी महादेव होरे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

रविवारी जिल्हा कारागृहात असलेल्या टॉवर क्रमांक २ च्या खाली असलेल्या गवतामध्ये पोलिसांना प्रत्येकी एक लिटरच्या दोन बाटल्यामध्ये थोडी दारु भरलेली असल्याचे आढळून आले. तसेच दोन मोबाईल आणि खाकी रंगाच्या पाकिटात गांजा असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी अज्ञातावर कारागृह अधिनियमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR