३० जूनपर्यंत कर्जमाफीचा निर्णय; कडूंचे आंदोलन तुर्तास मागे

मुंबई : ३० जूनपर्यंत कर्जमाफी करण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर सरकारनं हा निर्णय घेतला आहे. आम्ही जी उच्चस्तरीय कमिटी स्थापन केली आहे, ती समिती १ पर्यंत एप्रिल आम्हाला अहवाल देईल. त्यानंतर ३० जूनपर्यंत कर्जमाफीबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे आश्वासने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

आमच्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीबाबत घोषणा केली होती. त्यासंदर्भात आम्ही मागच्या काळात एक समिती स्थापन केली होती. उपाययोजना कशा करायच्या याचा निर्णय केला होता. कर्जमाफी हा एक भाग आहे. शेतकरी वारंवार कर्जाच्या विळख्यात अडकत आहे. पण त्यांना बाहेर कसे काढता येईल याचा आम्ही विचार करत आहोत. यादृष्टीने आम्ही मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

परदेशींच्या अध्यक्षतेखाली ९ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती कर्जमाफीसंदर्भात कशा पद्धथीने करता येईल, निकष काय असतील, भविष्यात शेतकरी कर्जाच्या विळख्यातून बाहेर कसे येतील त्यासंदर्भात अभ्यास करणार आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या समितीने आपले कामकाज पूर्ण करावे. कर्जमाफीसाठी काय निकष असावेत यासंदर्भातील अहवाल या समितीने द्यावा असे मुख्यमंत्री म्हणाले. या अहवालावर कर्जमाफीसंदर्भातीलनिर्णय आम्ही ३० जून २०२६ पूर्वी करु असे मुख्यमंत्री म्हणाले. आम्ही सगळे टप्पे ठरवले आहे. सगळ्या शेतकरी नेत्यांशी आमची सकारात्मक चर्चा झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

आम्ही कर्जमाफीबाबत सकारात्मक, दिलेला शब्द पाळणार
आम्ही कर्जमाफीबाबत सकारात्मक आहोत. दिलेला शब्द आम्ही पाळणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आताजर आपण शेतक-यांच्या खात्यात पैसे दिले नाहीत तर शेतकरी रब्बीची पेरणी करु शकणार नाही. त्यासाठी आता शेतक-यांना पैसे देणे महत्वाचे आहे. पैसे देण्यास सुरुवात झाली आहे. साडेआठ हजार कोटी रिलीज झाले आहेत असे मुख्यमंत्री म्हणाले. पुढच्या १५ ते २० दिवसांत राज्यातील ९० टक्के शेतक-यांच्या खात्यात पैसे पोहोचणार असल्याची माहिती मुख्यमंर्त्यांनी दिली आहे.

९ सदस्यीय समिती स्थापन
शेतक-यांच्या कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना करण्यात आली आहे. प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे. समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंर्त्यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार व मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परदेशींच्या अध्यक्षतेखाली ९ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29

Latest news