मुंबई : पीक विमा योजनेच्या धोरणात कुठलाही बदल करण्यात येणार नसून जुने तेच धोरण यंदा देखील कायम राहणार आहे. अडचणी येऊ नये म्हणून या संदर्भात काम केले आहे. त्यामुळे शेतक-यांच्या फायद्याचं काम होईल, धोरणात कुठले ही बदल केले नाहीत. अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. तर राज्यातील ३१ लाख प्रोत्साहन अनुदान लाभार्थी आहे. त्यातील १७ लाख लोकांपर्यंत कर्जमाफी देत आहोत. प्रोत्साहन अनुदान तिस-या किंवा चौथ्या यादीत येईल. यात ५ लाख लोकांनी केवायसी झालेले आहे. त्यामुळे त्यांना रक्कम द्यायला कुठली ही अडचण येणार नाही अशी देखील माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
राज्यातील २३ लाख शेतक-यांची प्रोत्साहन यादी आहे. त्यामुळे अजिबात काळजी करू नका. रक्कम कमी आली असली तरी वरची रक्कम राष्ट्रकृत बँक देणार असल्याचेही ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज योजनेतील जे शेतकरी राहिले होते त्यांना रक्कम दिली जाईल. यात पात्र शेतक-यांना त्यांची रक्कम मिळणार आहे. तसेच साखरेच्या भावात वाढ झाली आहे. त्याचा फायदा नक्की शेतक-यांना होणार आहे. मराठवाड्यात कमी पाऊस पडत असून आतापर्यंत मराठवाडा विभागात ७७ टक्के पाऊस पडलाय. तर कोकणात पाऊस जास्त आहे. कोकणात पेरणी ८४ टक्के पेक्षा जास्त झाली आहे. तर तिकडे अमरावतीत ९२ टक्के पेरणी झाली असून ठाणे जिल्ह्यात सर्वांत कमी पेरणी झाली आहे. मका, सुर्यफुल पीक पेरणी यंदा जास्त असून ४५ लाख १० हजार हेक्टर पेरणी झाली आहे. २४ हजार हेक्टर सोयाबीन पेरणीबाबत तक्रारी आल्या आहेत. खताचा साठा राज्यात मागणी प्रमाणे उपलब्ध आहे. त्यामुळे खताच्या बाबतीत घाबरण्याची गरज नाही. असेही कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले.
राज्यात सरासरी ८४ टक्के पेरण्या
राज्यात सगळीकडे पाऊस ब-यापैकी पडत आहे. विशेषत: धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होते आहे. फक्त मराठवाड्यात पाऊस कमी आहे, पण येणा-या दिवसात तिथे ही पावसाचा अंदाज आहे. कोकणात १११ टक्के, नाशिक ८३, पुणे ८७, मराठवाडा ७७ आणि विदर्भात ७३ टक्के पाणीसाठा आहे. तर राज्यात सरासरी ९४ टक्के पाऊस झाला आहे. राज्यात सरासरी ८४ टक्के पेरण्या झाल्या आहेत. अमरावती मध्ये ९२ टक्के तर सगळ्यात कमी ठाणे जिल्ह्यात पेरण्या झाल्या आहेत. मक्याची आणि सूर्यफुलाची पेरणी राज्यात सर्वात जास्त आहे. ४५ लाख हेक्टर पेरणी राज्यात पूर्ण झाली असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.
शेतकरी विचित्र आकडेवारीने संभ्रमात
रक्कम कमी आली असली तरी वरची रक्कम राष्ट्रकृत बँक देणार असल्याचेही ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज योजनेतील जे शेतकरी राहिले होते त्यांना रक्कम दिली जाईल. यात पात्र शेतक-यांना त्यांची रक्कम मिळणार आहे अशा संभ्रमात टाकणा-या वाक्यरचनेमुळे राज्यातील शेतकरी चक्रावून गेला आहे.
















