20.9 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeमहाराष्ट्रअंधेरी पूर्वसाठी ३१ टक्के मतदान

अंधेरी पूर्वसाठी ३१ टक्के मतदान

एकमत ऑनलाईन

६ नोव्हेंबर रोजी निकाल
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी ७ वाजेपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत झालेल्या या मतदान प्रक्रियेत केवळ ३१.७४ टक्के मतदान झाले असून सर्व प्रक्रिया शांततेत पार पडली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी आज दिली.

अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर अंधेरीत पोटनिवडणूक लागली. भाजपने ऋतुजा लटकेंविरोधात मुरजी पटेल यांना उमेदवारी दिल्यामुळे निवडणूक चर्चेत आली होती. मात्र राज ठाकरेंसह शरद पवारांनी विनंती केल्यानंतर भाजपने अंधेरीच्या मैदानातून माघार घेतली. त्यानंतर ऋतुजा लटके यांच्यासमोर ६ अन्य उमेदवारांचे आव्हान आहे.

अंधेरी पूर्व या मतदारसंघातील सर्व २५६ मतदान केंद्रांवर सकाळी ७ पासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीस सकाळी ११ वाजेपर्यंत फक्त ९.७२ टक्के मतदानाची नोंद झाली. दुपारी १ वाजेपर्यंत १६.८९ टक्के मतदान झाले, तर दुपारी ३ वाजेपर्यंत २२.८५ टक्के, सायंकाळी ५ वाजेपर्यंत २८.७७ टक्के मतदान झाले, तर मतदान प्रक्रियेच्या अखेरीस मतदारसंघात सुमारे ३१.७४ टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी दिली. भाजपने माघार घेतल्याने लटके यांच्या विरोधात अपक्षांसह ६ उमेदवार मैदानात होते. आता ६ नोव्हेंबर रोजी निवडणूक निकाल आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या